राजकारण
Trending

वय झालं अस म्हणणारे (अजित पवार) त्यांचा (शरद पवार) आशीर्वाद घ्यायला येतात यातच सर्व काही आलं ! परिस्थितीवर मार्ग काढण्याची विनंती, शरद पवार भूमीकेवर ठाम !!

मुंबई, दि. १७ – राष्ट्रवादी कॉंग्रेस विरोधी पक्षामध्येच असल्याचं स्पष्ट करत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, काल जशी विनंती केली तशाच प्रकारची विनंती आज (अजितदादा समर्थकांनी) शरद पवार यांच्याकडे केली. निर्माण झालेल्या परिस्थितीवर मार्ग काढा अशी विनंती त्यांनी केली. यावर शरद पवार त्यांना म्हणाले की, मागच्या निवडणूका आम्ही कॉंग्रेस सोबत एकत्र लढलो, अडीच वर्षे महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. अनेकवेळा आपण लोकांसमोर भूमीका मांडली, असे शरद पवार त्यांना म्हणाले. याशिवाय शरद पवार यांनी आपली भूमीका येवल्यात स्पष्ट केली. वारंवार भूमीका स्पष्ट करणं योग्य नाही, असेही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. दरम्यान, वय झालं अस म्हणणारे (अजित पवार) त्यांचा (शरद पवार) आशीर्वाद घ्यायला येतात यातच सर्व काही आलं, असही जयंत पाटील यावेळी एका प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले.

काल अजित पवार समर्थकांनी शरद पवारांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला व पक्ष एकसंघ राहण्याची विनंती केली. आजही अजित पवार समर्थक यांनी पुन्हा शरद पवार यांची भेट घेतली. दरम्यान, या सर्व परिस्थितीनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमीका स्पष्ट केली. जयंत पाटील म्हणाले की, शरद पवार यांच्या भूमीकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचं काही एक कारण नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचं एक मोठं कुटुंब आहे. या कुटुंबातील काही लोकांनी वेगळी कृती केली. ते आज भेटायला आले होते. या सर्व परिस्थितीवर मार्ग काढण्याची विनंती त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली. मात्र, शरद पवार यांची भूमीका अगदी स्पष्ट आहे. आम्ही विरोधी पक्षात आहोत. यापूर्वीही शरद पवार यांनी येवला येथे आपली भूमीका स्पष्ट केली असल्याचेही जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील म्हणाले की, नऊ आमदरांनी मंत्रीपदाची शपथ घेतली हे खरं आहे. ज्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली त्यांनी पक्षाच्या ध्येय धोरणाचे उल्लंघन केले आहे. बाकीचे सर्व आमदार आमच्यासोबत आहे. जे नऊ आमदार आहेत तेही स्वतहाला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातच असल्याचे सांगतात. दरम्यान, अधिवेशनाच्या आज पहिल्या दिवशी मला वाटतं २० ते २२ आमदार तसेच विधान परिषदेचे ३ आमदार उपस्थित होते. सध्याचा एवढा मोठा पाऊस पडला आहे. त्यामुळे मुंबईला यायला टाळाटाळ करत आहे, असेही जयंत पाटील यांनी अधिवेशनातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार उपस्थितीवर स्पष्टीकर दिले.

दरम्यान, आज भेटायला आलेल्या अजित पवार समर्थकांनी परिस्थितीतून मार्ग काढा अशी विनंती केली. आपल्याकडे जर कोणी आलं तर त्यातून विश्लेषणात्मक टिप्पनी करणं योग्य नाही. ते नाराज होते का, त्यांचे चेहरे कसे होते, यावर मला सांगता येणार नाही आमदार नाराज आहे का हे त्यांनाच विचारा असेही पाटील प्रसार माध्यमांना म्हणाले.

Back to top button
error: Content is protected !!