23 शिक्षणाधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचा निर्णय, चौकशीअंती नियमानुसार कारवाई करणार !
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती
मुंबई, दि. 25 : सन 2022-23 मध्ये 23 शिक्षणाधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये दोषी शिक्षणाधिकाऱ्यांवर चौकशीअंती नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली.
राज्यातील 23 शिक्षणाधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीबाबत सदस्य अब्दुल्लाखान दुर्राणी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. मंत्री केसरकर म्हणाले की, या प्रकरणी एका प्रकरणात चौकशीअंती संबंधित अधिकाऱ्याविरूद्ध शिक्षा बजाविण्यात आली आहे. उर्वरित प्रकरणी चौकशीची कार्यवाही सुरू आहे. चौकशीअंती संबंधित दोषींविरुद्ध प्रचलित नियमानुसार पुढील कार्यवाही करणे शक्य होईल, असे मंत्री केसरकर यांनी यावेळी सांगितले.
या चर्चेत सदस्य सर्वश्री विक्रम काळे, प्रा. राम शिंदे, सत्यजित तांबे, अभिजित वंजारी यांनी सहभाग घेतला.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe