महाराष्ट्र
Trending

तहसिलदारास १५ लाखांची लाच घेताना राहत्या घराच्या पार्किंगमध्ये पकडले ! महसूल विभागाला लाचखोरीने पोखरले !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ७- जमिनीमध्ये मुरूम उत्खनाचे मुल्य नियमानुसार पाच पट दंड आकारणी संदर्भातील फेर चौकशीदरम्यान १५ लाखांची लाच घेताना नाशिकच्या तहसिलदाराला त्याच्या राहत्या घराच्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये रगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे महसूल प्रशासनातील भ्रष्ट्राचाराची कीड पुन्हा एकदा समोर आली आहे.

नरेशकुमार तुकाराम बहिरम (वय – ४४ वर्षे, तहसीलदार, नाशिक, सध्या रा. फ्लॅट नंबर -६०४, बी विंग, मेरिडियन गोल्ड, कर्मयोगी नगर, नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. यातील तक्रारदार यांना कायदेशीर कारवाईकामी अधिकारपत्र प्राप्त असलेल्या जमीन मालक यांचे जमिनीमध्ये मुरूम उत्खनाचे मुल्य नियमानुसार पाच पट दंड आकारणी बाबत उपविभागीय अधिकारी, नाशिक यांचे कडील अपीलात आदेश होवून सदरचे प्रकरण पुनश्च फेर चौकशी करीता आरोपी तहसिलदार नरेशकुमार तुकाराम बहिरम यांच्या कडे पाठविण्यात आले होते.

आरोपी तहसिलदार नरेशकुमार तुकाराम बहिरम यांनी स्थळनिरीक्षण करीता बोलावले त्यावेळी आरोपी तहसिलदार नरेशकुमार तुकाराम बहिरम यांनी तक्रारदार यांच्या कडे १५,००,०००/- रु. लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक कार्यालयात तक्रार दिली.

सदर तक्रारीवरून ला. प्र. वि. नाशिक पथकाने पडताळणी करून सापळा आयोजित केला असता सापळा कारवाई दरम्यान आरोपी तहसिलदार नरेशकुमार तुकाराम बहिरम यांनी तक्रारदार यांच्या कडे १५,००,०००/- रु. लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम दि.०५.०८.२०२३ रोजी आरोपी तहसिलदार नरेशकुमार तुकाराम बहिरम यांचे कर्मयोगी नगर येथील राहत्या घराच्या अपार्टमेटच्या पार्कीगमध्ये स्वीकारल्याने त्यांना पकडण्यात आले असून त्यांचेविरुध्द भ्र.प्र. का.सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा नोंदविण्याची पुढील कार्यवाही सुरू आहे.

Back to top button
error: Content is protected !!