छत्रपती संभाजीनगरफुलंब्री
Trending

खामगावचे ४ सराईत चोरटे एक वर्षासाठी हद्दपार ! फुलंब्री, सिल्लोड आणि खुलताबादेत चौघांनी घातला होता हैदोस !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २५- वडोदबाजार हद्यीतील 4 सराईत चोरट्यांना पोलीस अधीक्षकांनी एक वर्षासाठी हद्यपार केले आहे. 1) अमर सुरजप्रसाद दुबे (टोळी प्रमुख, वय 28 वर्ष रा. जळगाव ह.मु. खामगाव ता. फुलंब्री), 2) आकाश सुरजप्रसाद दुबे (वय 30 वर्षे रा. जळगाव ह.मु. ह.मु. खामगाव ता. फुलंब्री), 3) सागर राजु सोनवणे (वय 30 वर्षे रा. खामगाव ता. फुलंब्री) 4) संतोष संजय सोनवणे (वय 22 वर्षे रा. खामगाव ता. फुलंब्री) अशी हद्दपार केलेल्या सराईत चोरट्यांची नावे आहेत. फुलंब्री, सिल्लोड आणि खुलताबाद परिसरात या चौघांवर एकत्रीतपणे टोळीने शेतक-यांच्या शेतातील विहीरीवरिल बसविलेल्या इलेक्ट्रीक मोटारी नियोजितपणे चोरी केल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी जिल्हयातील गुन्हेगारांची पायेमुळे समुचय नष्ट करून त्यांचे वाढते गुन्हेगारी कारवाई थांबविण्यासाठी त्यांच्या विरुध्द सक्त व कठोर धोरण अवलंबून कायदेशीर रित्या त्यांच्या मुसक्या आवळून त्यांना एम.पी.डी.ए. तसेच हद्यपारी प्रमाणे कारवाई केली आहे.

पोलीस ठाणे वडोदबाजार हद्यीतीत राहणारे 4 सराईत चोरटे ज्यात 1) अमर सुरजप्रसाद दुबे वय 28 वर्ष रा. जळगाव ह.मु. खामगाव ता. फुलंब्री (टोळी प्रमुख) 2) आकाश सुरजप्रसाद दुबे वय 30 वर्ष रा. जळगाव ह.मु. ह.मु. खामगाव ता. फुलंब्री 3) सागर राजु सोनवणे वय 30 वर्षे रा. खामगाव ता. फुलंब्री 4) संतोष संजय सोनवणे वय 22 वर्षे रा. खामगाव ता. फुलंब्री यांनी पोलीस ठाणे वडोदबाजार, फुलंब्री, सिल्लोड शहर, खुलताबाद या ठिकाणी एकत्रीतपणे टोळीने शेतक-यांचे शेतातील विहीरीवरिल बसविलेल्या इलेक्ट्रीक मोटारी नियोजितपणे चोरी केल्याचे अनेक गुन्ह्यासह इतर चोरीचे सुध्दा गुन्हे दाखल आहेत. यांच्यावर दाखल गुन्ह्याचा आलेख हा वाढतच चाललेला होता. यामुळे परिसरातील शेतक-यामध्ये भीती व दहशतीचे वातावरणा निर्माण झाले होते.

यामुळे पोलीस ठाणे वडोदबाजार येथील सपोनि विलास मोरे यांनी त्यांचा हद्यपार प्रस्ताव पोलीस अधीक्षक यांना सादर केल्याने पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या वाढत्या कारवाई रोखण्याचे अनुषंगाने त्यांच्यावर वचक निर्माण होण्यासाठी अश्या प्रकारे गंभीर गुन्हे करणा-या टोळी विरूध्द सक्त भुमिका घेत या 04 चोरट्यांना महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 55 (1) प्रमाणे छत्रपती संभाजीनगर जिल्हा व शहरा बाहेर हद्यपार केले आहे.

ही कारवाई एसपी मनिष कलवानिया, सुनील कृष्णा लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक, जयदत्त भवर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश वाघ, सपोनि विलास मोरे, पो.उप.नि. संभाजी खाड, पोलीस अंमलदार शंकर चव्हाण, निवृत्ती मदने, दीपक सुरवसे, शैलेश गोरे, अंकुश बागुल, रवि देशमुख, योगेश चेळकर यांनी केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!