छत्रपती संभाजीनगर
Trending

हर्सूल, सावंगी, माळीवाडा, वाळूज महानगर शाखेतील ३९ जणांवर वीजचोरीचे गुन्हे दाखल !

संभाजीनगर लाईव्ह, दि. ७ : तालुक्यातील महावितरणच्या हर्सूल, सावंगी, माळीवाडा तसेच वाळूज महानगर शाखेतील तब्बल ३९ वीजचोरांवर छावणी व चिकलठाणा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नायगाव येथील महमूद शेख, भिकन कसारे, शेख नजीर, सखाराम कसारे, शकुंतला तांबे, दौलत कसारे, सुदाम कसारे, परसराम कसारे, ओंकार कसारे, शफी सय्यद, एकनाथ कसारे, साईनाथ कसारे, सोमीनाथ कसारे, अनिल कसारे, सोमीनाथ बत्तीसे, सतीश कसारे, संजय पवार, महमूद शेख व शफिक शेख, वडगाव कोल्हाटी येथील प्रतिभा सूर्यवंशी, विक्रम जाधव, रमेश दमधर, पुरुषोत्तम कोकाटे,पद्मधर कोकाटे आणि माळीवाडा येथील लताबाई अंगरे, सुनीता आस्वार, सुनील शिंदे, अन्नू गायकवाड, सिद्धार्थ साठे, सुनील साठे, अलका वालेकर, सत्यभामा दणके, गणेश खंडागळे, प्रकाश भालेराव, कैलास गायकवाड, बाबुराव रंधे, सूर्यभान साठे, गौतम साठे, सविता साठे या वीजचोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे,

महावितरणचे मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे यांच्या आदेशाने अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, कार्यकारी अभियंता विष्णू ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली जून, जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये वीजचोरीविरोधात धडक मोहीम राबवण्यात आली. तालुक्यातील ‍विविध गावांत घरगुती व व्यावसायिक वापरासाठी मीटरमध्ये फेरफार व विद्युत वाहिनीवर आकडे टाकून चोरी करणाऱ्या एकूण २३३ चोरांवर करण्यात आली असून वीजचोरीपोटी त्यांना दंड २७ लाख ६० हजारांचा दंड आकारण्यात आला आहे.

यापैकी ७४ लोकांनी पैसे न भरल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर ग्रामीण -१ उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रवीण पवार यांनी दिली. या मोहीमेत शाखा अभियंता फिरोज शेख, धनंजय बाणेदार, गोविंद दुसंगे, हकीम व नरेंद्र शिंदे सहभागी झाले होते.

Back to top button
error: Content is protected !!