उस्मानपुऱ्यातील तीन चोरटे जेरबंद, चोरीतील रक्कम चोरट्यांनी आपसात वाटून घेतली ! सातारा परिसरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या पुंडलिक नगर पोलिसांनी आवळल्या !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १४- पुंडलिकनगर पोलिसांनी सातारा पोलिस स्टेशन हद्दीतील गुन्ह्यातील घरफोडीचे आरोपी जेरबंद केले. कारगील मैदान परिसरात सापळा लावून पोलिसांनी उस्मानपुऱ्यातील तीन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. आरोपींच्या ताब्यातून चोरीस गेलेले चांदीचे भांडे व इतर चांदिचे साहित्य एकूण 70,000/- किंमतीचे जप्त करण्यात आले आहे. चोरीतील रोख रक्कम चोरट्यांनी आपसात वाटून ती खर्च केल्याची कबुली दिली.
1) अनिल प्रकाश पौळ वय 28 वर्षे रा. रेल्वे पटरी जवळ मिलींदनगर, उस्मानपुरा, 2) अनिल प्रभाकर गायकवाड वय 33 वर्षे रा. मुरलीधरनगर, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर, 3) विनोद विजय बत्तीसे वय 32 वर्षे रा. मिलींदनगर, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर अशी आरोपींची नावे आहेत.
दिनांक 12/09/2023 रोजी पोउपनि शेळके यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीनुसार तीन जण हे चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी फिरत आहेत व ते कारगील मैदानकडे येणार आहे. ही खात्रीशिर माहिती मिळाल्याने पुंडलिक नगर पोलिसांनी तात्काळ सापळ्याचे नियोजन केले. सदर ठिकाणी 19.00 वाजेच्या सुमारास मिळालेल्या बातमीदाराच्या वर्णनाप्रमाणे तीन जण येताना पोलिसांना दिसले. त्यांना विचारपुस केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक विचारणा केली असता त्यांची नावे 1) अनिल प्रकाश पौळ वय 28 वर्षे रा. रेल्वे पटरी जवळ मिलींदनगर, उस्मानपुरा, 2) अनिल प्रभाकर गायकवाड वय 33 वर्षे रा. मुरलीधरनगर, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर, 3) विनोद विजय बत्तीसे वय 32 वर्षे रा. मिलींदनगर, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर असे सांगितले.
विनोद विजय बत्तीसे यांच्या हातातील पिशवीमध्ये काय आहे असे विचारले असता तो उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याचे समजल्याने पोलिसांनी पिशवीची झडती घेतली. पिशवीमध्ये चांदी सारख्या धातुचे ताटे, फुल पात्र, ग्लास, समई, संघीपात्र अशा वस्तू दिसून आल्या. पोलिसांनी त्यास सदर वस्तू बाबत विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने सांगितले की, मी व माझ्या सोबत अनिल पौळ, अनिल गायकवाड व प्रेम उर्फ भैय्या संजय खरे (रा. मिलींदनगर, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर) असे चौघांनी सुमारे 15 ते 20 दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी निशांत पार्कच्या पाठीमागे असलेल्या एका बंद घराचे लॉक तोडून घरातील चांदीच्या वस्तु व रोख रक्कम चोरी केली होती.
त्या चोरीतील चांदीच्या वस्तु विक्री करण्यासाठी ग्राहक शोधत असल्याची कबुली त्याने दिल्याने पोलिसांनी अभिलेखाची पडताळणी केली असता सातारा पोलिस स्टेशनमध्ये गु.र.नं. 281/2023 कलम 454,457,380 भा.द.वी प्रमाणे दाखल असल्याचे समजले. त्यावरून पोलिसांनी नमुद गुन्ह्यातील रोख रक्कमे बाबत विचारपुस केली असता सदरची रक्कम ही प्रत्येकाने 2,000/- रुपये वाटून घेतले असून ती रोख रक्कम खर्च झाल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.
सदर गुन्ह्यात चोरीस गेलेले चांदीचे भांडे व इतर चांदिचे साहित्य एकूण 70,000/- किंमतीचे जप्त करण्यात आले आहे. आरोपीतांना त्यांच्या ताब्यातून जप्त झालेल्या मुद्देमालासह सातारा पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस उप-आयुक्त परिमंडळ- 2 शिलवंत नांदेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजश्री आडे पोलीस निरीक्षक पो. स्टे पुंडलीकनगर, पोउपनि कल्याण शेळके, पोना दीपक देशमुख, पोअ. प्रशांत नरोडे, अमोल आहेर, दीपक जाधव, संदीप बीडकर, शिवाजी गायकवाड, निरज कुलकर्णी, कल्याण निकम, अजय कांबळे यांनी पार पाडली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe