आमखास मैदानाजवळच्या अतिक्रमणावर जेसीबी फिरवला ! उद्यानासाठी राखीव जागेवर दुकाने थाटून चढवली होती भाड्याने !!
संभाजीनगर लाईव्ह, दि.२५ – महानगरपालिकेच्या प्रशासकीय अतिक्रमण हटाव विभागामार्फत आज शहरातील आमखास मैदान स्मार्ट सिटी कार्यालय जवळ उद्यान साठी आरक्षित जागेवरील अनधिकृत बांधकामे निष्कर्षित करण्यात आले. जागा ही आरक्षणामध्ये उद्यानासाठी राखीव आहे. आरक्षण क्रमांक 106 झिरो पॉईंट 62 हेक्टर जागा असून सदर जागेवर अतिक्रमण धरकाने डिसेंबर महिन्यात अनधिकृतपणे पत्राचे शेड टाकून ते भाड्याने दिले होते.
यामध्ये चहाचे दुकान, खानावळ, फिजा रसवंती फिजा ज्यूस सेंटर आदी दुकानांचा समावेश होता. याबाबत डिसेंबर 2022 मध्येच संबंधितास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 260 ची नोटीस दिली होती परंतु त्यांनी याबाबत समाधानकारक खुलासा केला नाही व बांधकाम परवानगी घेतली नाही म्हणून संबंधित अंतिम सूचनाबाबत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 478 दोन ची नोटीस दिली होती. या नोटीसनंतरही सदर अनधिकृत बांधकाम न काढता वाणिज्य वापर थांबलेला नव्हता. याच्या बाजूला एका रिकाम्या जागेवर श्री नुमान हमीद उल्ला खान यांनी या प्रकारचे सेट टाकण्याचा प्रयत्न केला असता संबंधितास जून 2023 मध्ये नियमनुसार पंचनामा केला व बांधकाम थांबवले.
सदर व्यक्तीने त्या दिवसापासून कोणते प्रकारचे बांधकाम न करता त्याचा वापर ही सुरू नाही केला. दरम्यानच्या काळात मुनी उल्ला खान यांनी महानगरपालिकेने दिलेला 478 दोनची नोटीसला मनपा न्यायालयात आव्हान दिले असता महानगरपालिकेच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ जयंत वासेकर यांनी मनपाची बाजू मांडली. यामध्ये निकाल महानगरपालिकेचे वतीने लागला. त्या अनुषंगाने आज कारवाई करण्यात आली.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या वेळेस प्रशासक जी श्रीकांत यांनी सुद्धा या जागेची पाहणी करून लवकरात लवकर बांधकाम काढण्याबाबत तोंडी सूचना दिली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार आज सकाळी हे पूर्ण बांधकाम काढून टाकण्यात आले. सदर कारवाई दरम्यान बांधकाम धारक मुनीम उल्ला खान यांनीही मदत करून स्वतःचे साहित्य आणले व आपले पत्रे वगैरे काढले. याच्या बाजूला असलेले फिजा रसवंती त्यांनी आपले स्वतः अतिक्रमण काढून घेतले.
सदर कारवाई आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त अतिक्रमण विभाग प्रमुख सविता सोनवणे, पद निर्देशित अधिकारी संजय सुरडकर, अशोक गिरी ,अतिक्रमण निरीक्षक रामेश्वर सुरासे, सय्यद जमशेद, माजी सैनिक व मनपा कर्मचारी यांनी पार पाडली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe