छत्रपती संभाजीनगर
Trending

यशस्विनी महिला स्वयंसह्यता सहकारी पतसंस्थेत ४८ कोटींचा घोटाळा ! सुमारे ६० बचत गटांनी २९ कोटी गिळले, सविस्तर वाचा सर्व बचत गटांची यादी !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ११- संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील २०० कोटींपेक्षा मोठ्या घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत मॅनेजर व आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील घोटाळ्यातील प्रमुख आरोपी देवीदास सखाराम आधाने (संस्था अध्यक्ष यांचे पती) यांचा नवा घोटाळा उजेडात आला आहे. अंबादास मानकापे यांच्यासारखीच पतसंस्था त्यांनी स्थापन केली. औरंगाबाद जिल्हा यशस्विनी महिला स्वयंसाह्यता गटाची सहकारी पतसंस्था असे तिचे नाव. या पतसंस्थेत 47,82,41,318 रुपयांचा (सुमारे ४८ कोटी) घोटाळा झाल्याप्रकरणी सिडको पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या पतसंस्थेचे मुख्य कार्यालय नवजीवन कॉलनी, हडको, छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. आदर्श नागरी सहकारी पतसंस्था आणि औरंगाबाद जिल्हा यशस्विनी महिला स्वयंसाह्यता गटाची सहकारी पतसंस्था यांचे प्रशासन, संचालक मंडळ आणि व्यवहार हे गुंतागुंतीचे असल्याने आता पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. अर्थतज्ञही चक्रावून जातील अशा पद्धतीचा अपहार आणि बनावट कागदपत्रे तयार करून हा अपहार केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सीए महेश जगन्नाथराव कदम (व्ही ए एम यू अॅड असोसिएट्स, सनदी लेखापाल या भागीदार संस्थेचा भागीदार) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या परवानगीनुसार औरंगाबाद जिल्हा यशस्विनी महिला स्वयंसाह्यता गटाची सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेचे सन 2022-2023 या आर्थिक वर्षाचे वैधानिक लेखापरीक्षण दिनांक 25/06/2023 ते 31/08/2023 पर्यंत पूर्ण केले. हा अहवाल दिनांक 31/08/2023 रोजी व विनिर्दीष्ट अहवाल व विशेष अहवाल दिनांक 04/09/2023 रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था या कार्यालयात दाखल करण्यात आला आहे.

संस्थेचे वैधानिक लेखापरीक्षण करत असताना आर्थिक वर्ष 2022-2023 संस्थेच्या जिल्ह्यातील संलग्न शाखांचे व्यवस्थापक व मुख्य शाखे मार्फत आलेले कर्ज मागणी अर्ज व इतर अनुषंगिक कागदपत्रे यांची मुख्य कार्यालयातील कर्ज विभागाकडून परिपूर्ण छानणी करून ते पोटनियमातील तरतुदींच्या निकषानुसार पात्र असल्यास संस्थेच्या संचालक मंडळाने सभेत सर्व समावेशक विचार करून मंजुरी अंती कर्ज वितरण करणे बंधन कारक आहे. सदर कर्ज मंजुरी ही संस्थेच्या मंजूर पोटनियमातील तरतुदीनुसारच झालेली आहे किंवा कसे या अनुषंगाने कर्ज प्रकरणाचे लेखापरीक्षण केले असता ते पोटनियमातील तरतुदी नुसार झाले नसल्याचे निदर्शनास आले आहे. बचत गटाचे नावाने बचत गटाचे नावाने कागदपत्रे बनवून कर्ज उचलून ठेवीदारांच्या पैशांचा, निधीचा गैरविनियोग, अफरातफर फसवणूक केली असल्याचे दिसून येत आहे.

1) अपहारातील सहभाग:- सर्व संचालक मंडळ व इतर संचालकांचे नावे
1) सौ सविता देविदास अधाने, अध्यक्ष रा. प्लॉट न १, के सेक्टर नवजीवन कॉलनी हडको न ११, औरंगाबाद 2) सौ मनीषा कैलास अंभोरे उपाध्यक्ष पत्ता उपलब्ध नाही 3) सौ वर्षा राजेंद्र कोळगे संचालिका पत्ता उपलब्ध नाही 4) सौ विजया सुभाष सुरासे संचालिका पत्ता उपलब्ध नाही 5) सौ सविता अनिल गिराम संचालिका पत्ता उपलब्ध नाही 6) सौ अनिता संदीप काळे संचालिका पत्ता उपलब्ध नाही 7) सौ भाग्यश्री कारभारी निकम संचालिका पता उपलब्ध नाही 8) सौ कविता बाबासाहेब नागुर्डे संचालिका पत्ता उपलब्ध नाही 9) सौ मंदा कैलास काकडे संचालिका पता उपलब्ध नाही 10) सौ जुवेदाबी बाबू शहा संचालिका पता उपलब्ध नाही 11) सौ हिराबाई चांगदेव चन्ने संचालिका पता उपलब्ध नाही 12) सौ कविता अंकुश सोनवणे संचालिका पता उपलब्ध नाही 13 ) सौ मंगल रावसाहेब मोरे संचालिका पता उपलब्ध नाही 14 ) गणेश नानासाहेब शिंदे माजी व्यवस्थापक पत्ता उपलब्ध नाही 15) पवन देविदास अधाने व्यवस्थापक पता प्लॉट न 1 के सेक्टर नवजीवन कॉलनी हडको न 11, औरंगाबाद 16) देविदास सखाराम अधाने संस्था अध्यक्ष यांचे पती प्लॉट न के सेक्टर नवजीवन कॉलनी हडको न ११ औरंगाबाद.

अपहाराची रक्कम रु. 28,81,85,036/- रुपयांचे कर्ज प्रकरणे व सविस्तर तपशील खालीप्रमाणे. (बचत गटाचे नाव व मंजूर रक्कम व येणे बाकी रक्कम)

बोरवाडी महिला बचतगट काटशेवरी – 51,00,000 – 29,73,929

रानमळा महिला बचतगट काटशेवरी-  70,00,000 – 37,15,984

तुळजाभवानी म बचतगट धोपटेश्वर – 36,50,000 – 17,23,220

आदीशक्ती महिला बचतगट मायुरनगर – 55,45,000 – 32,49,170

रेणुका माता म. स्वयंसहाय्यता बचतगट – 13,80,00,000 – 1,32,45,519

शिवसंगमेश्वर फार्मर प्रोडुसर कंपनी – 3,00,00,000 – 2,04,35,047

गोशाळा महिला बचतगट सातारा परिसर – 24,00,000 – 3,75,000

जय लक्ष्मी महिला बचतगट घोडेगाव – 16,00,000 – 17,67,355

गिरजामाता महिला बचतगट हडको – 26,00,000 – 29,50,172

वनदेव महिला बचत गट बोरवाडी – 28,50,000 – 31,89,169

गोशाला महिला बचतगट काटशेवरी – 23,00,000 – 41,14,955

जय लक्ष्मी महिला बचतगट, शाखा हडको – 18,50,000 – 19,96,412

रेणुका माता महिला बचत गट नवनाथ नगर – 2,20,00,000 – 1,24,39,584

धामणगाव महिला बचतगट – 54,50,000 – 47,01,130

गिरजामाता महिला बचत गट एन-११ – 1,40,00,000 – 1,32,88,491

रिद्धी सिद्धी महिला बचत गट एन-११ – 20,10,000 – 17,89,916

खाजागरीब नवाब म. बचतगट रहेमानिया कॉलनी – 20,00,000 – 19,08,004

साई म स्वयं सहायता बचतगट जाधववाडी – 25,00,000 – 23,18,842

टिभे म. स्वयं.स. बचत गट टी. व्ही. सेन्टर – 24,90,000 – 24,43,653

केतकी म स्वयंस बचतगट वानखेडेनगर – 24,30,000 – 23,81,588

जय हरी म स्वयंसहायता बचतगट, हर्सूल – 30,30,000 – 24,61,110

स्वामी समर्थ महिला बचत गट कानडगाव – 45,82,000 – 43,87,491

सौ गिरजा माता महिला बचत चिकलठाणा – 47,00,000 – 46,56,172

जगदंबा महिला बचतगट घोडेगाव – 39,60,000 – 37,46,364

गायत्री महिला बचत गट हडको – 38,30,000 – 38,35,975

श्री शारदा म बचतगट नवजीवन कॉलनी – 61,40,000 – 61,34,431

घृष्णेश्वर महिला सूतगिरणी बचतगट – 8,00,00,000 – 69,08,254

राधाई महिला बचत गट – 35,00,000 – 34,86,390

रेणुकामाता म. बचतगट पुंडलिकनगर – 17,00,000 – 15,04,916

रेणुका म. बचत गट विरमगाव – 5,00,00,000 – 52,31,609

श्री. गिरिजामाता म. बचतगट विरमगाव – 5,00,00,000 – 43,17,353

विजया म. बचतगट नवजीवन कॉलनी – 60,00,000 – 61,24,753

संगमेश्वर म.दुध उत्पादक संस्था म. बचतगट, शाखा सिडको – 60,00,000 – 54,41,473

राष्ट्रमाता जिजाऊ महिला बचतगट – 60,00,000 2,31,28,931

वनदेव म. बचतगट बोरवाडी काटशेवरी – 38,25,000 – 31,48,231

गिरजामाता म. स्वयंसहाय्यताअल्प ब. गट – 53,00,000 – 47,79,861

गायत्री म. स्वयंसहाय्यता अल्प बचतगट – 16,90,000 – 12,22,731

दुर्गामाता महिला बचतगट- आंबेवाडी – 14,50,000 – 14,35,621

जयसद्गुरु म. स्वयंसहाय्यता बचतगट – 18,31,000 – 16,32,571

जय दुर्गा म स्वयंसहाय्यता ब गट जाफरवाडी – 14,59,000 –  12,83,461

रेणुकामाता म. स्वयंसहाय्यता बचतगट – 12,99,000 – 10,51,503

रेणुकामाता म. बचतगट अविष्कार कॉलोनी – 25,00,000 – 24,92,257

वनदेव म. बचतगट बोरवाडी काटशेवरी – 30,00,000 – 26,72,307

संभाजीराजे म. स्वयंसहाय्यता बचतगट – 16,05,000 – 14,01,729

जय बालाजी महिला स्वयंसहाय्यता बचतगट – 17,80,000 – 15,98,155

आदर्श महिला बचतगट – आडूळ – 20,20,000 – 18,22,943

शेख महिला बचतगट- आडूळ – 16,96,620 – 18,17,881

तुळजाभवानी महिला बचतगट- आडूळ – 17,86,851 – 18,15,458

जय लक्ष्मी महिला बचतगट सावखेडा – 14,81,415 – 15,02,848

जय सप्तशृंगी महिला बचतगट-बोडखा – 15,76,184 – 16,18,547

अक्सा महिला बचतगट- पांढरीपिंपळगाव शाखा चिकलठाणा विमानतळ – 13,66,927 – 14,11,929

जगदंब बचत गट कचनेर (जि. एन. शिंदे) शाखा काटशेवरी – 63,75,000 – 63,78,144

शिव संगमेश्वर म. बचत गट बोरवाडी – 32,00,000 – 30,71,058

गिरजा माता म बचत गट विरमगाव – 39,00,000 – 31,11,568

जिजामाता महिला बचत गट बोरवाडी – 35,00,000 – 34,58,953

शिवपार्वती महिला बचत गट बोरवाडी – 34,00,000 – 34,09,931

जय लक्ष्मी महिला बचत गट घोडेगाव – 3,00,000 – 33,56,878

रेणुका अभिनय पणन सह संस्था म. खुलताबाद मका खरेदी – 27,00,000 – 26,71,126

घृष्णेश्वर महिला सूतगिरणी बचतगट – 35,00,000 – 35,22,757

वनदेव महिला बचत गट – 28,00,000 – 27,56,034

Back to top button
error: Content is protected !!