महाराष्ट्रराजकारण

मराठा आरक्षण: सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला उद्धव ठाकरेंना डावललं, संजय राऊत म्हणाले महाराष्ट्र पेटला यांचे निर्लज्ज राजकारण ! नेटकऱ्यांनी राऊतांनाही दिली आठवण करून, मराठा क्रांती मोर्चाला मुका मोर्चा म्हणून हिणवणाऱ्या पक्षाला नसेल बोलावल, स्वतःची केलेली कर्म आठवा आधी !!

मुंबई, दि. १ – मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी शांततेत्या मार्गाने उपसलेल्या आंदोलनाचा धसका राज्य सरकारने घेतला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मुंबईत बोलावलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला उद्धव ठाकरे यांना डावलण्यात आले आहे. त्यांच्या गटाच्या पक्षाला निमंत्रण न दिल्याने हे सरकार सुडबुद्धीने काम करत असल्याचा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणासंदर्भात सह्याद्री अतिथीगृह, मंत्रिमंडळ सभागृह, मलबार हिल, मुंबई येथे दिनांक १ नोव्हेंबर, २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. सदर बैठकीस उपस्थित राहण्याबाबत राज्याचे अवर सचिव यांनी राज्यातील सर्व सर्वपक्षीय नेत्यांना या बैठकीस निमंत्रण पाठवले आहे. सर्वपक्षीय नेते आणि प्रशासकीय अधीकारी अशा ३८ जणांना हे निमंत्रण पाठवले असून उद्धव ठाकरे यांना या निमंत्रण यादीतून वगळण्यात आले आहे.

शिवसेना यांच्या डोळ्यात खुपते- संजय राऊत
या सरकारचे करायचे काय? महाराष्ट्र पेटलाय तरी यांचे निर्ल्लज्ज राजकरण सुरूच आहे. मराठा आरक्षणावर सर्व पक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली. त्या बैठकीचे निमंत्रण शिवसेनेला नाही. शिवसेनेचे 16 आमदार व 6 खासदार आहेत. सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. एक आमदार असलेल्यांना आमंत्रण. एकही आमदार नाही अशांना देखील बोलावले. पण शिवसेना यांच्या डोळ्यात खुपते. अंबादास दानवे यांना विरोधी पक्षनेते म्हणून बोलावले. ठीक. आम्हाला मानपान नको. पण प्रश्न सोडवा. जरंगे पाटील यांचे प्राण वाचवा. घटनाबाह्य सरकारची घटका भरलीच आहे. हिशोबाचे वेळ जवळ येत आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातू दिली. यावर एक नेटकर्याने दिलेली प्रतिक्रिया दिली की, मराठा क्रांती मोर्चा ला मुका मोर्चा म्हणून हिणवणाऱ्या पक्षाला नसेल बोलावल. स्वतःची केलेली कर्म आठवा आधी.

दरम्यान, निमंत्रण पत्रीका अशी-

तातडीचे / अतिमहत्त्वाचे

बैठक दिनांक :- १ नोव्हेंबर, २०२३.

वेळ :- सकाळी १०.३० वाजता

स्थळ- सह्याद्री अतिथिगृह, मंत्रिमंडळ सभागृह, मलबार हिल, मुंबई.

प्रति,

१. मा. मंत्री, महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय

२. मा. मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्य

३. मा. मंत्री, ग्रामविकास व पंचायत राज, पर्यटन

४. मा. मंत्री, उद्योग

५. मा. मंत्री, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)

६. मा. मंत्री, राज्य उत्पादन शुल्क

७. मा. श्री. शरद पवार, माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

८. मा. श्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री तथा वि.स.स.. राष्ट्रीय काँग्रेस पक्ष

९. मा. श्री. छत्रपती उदयनराजे भोसले, राज्यसभा सदस्य, भारतीय जनता पक्ष

१०. मा. श्री. सुनिल तटकरे, लोकसभा सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

११. मा. श्री अंबादास दानवे, विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानपरिषद

१२. मा. श्री विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानसभा

१३. मा. श्री नाना पटोले, वि.स.स., राष्ट्रीय काँग्रेस पक्ष

१४. मा. श्री बाळासाहेब थोरात, वि. स. स.. राष्ट्रीय कांग्रेस पक्ष १५. मा. श्री जयंत पाटील, वि.स.स., राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

१६. मा. श्री राजेश टोपे, वि.स.स., राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

१७. मा. श्री चंद्रशेखर बावनकुळे, वि.प.स., भारतीय जनता पक्ष

१८. मा. श्री जयंत पाटील, वि.प.स., शेतकरी कामगार पक्ष

१९. मा. श्री हितेंद्र ठाकूर, वि.स.स., बहुजन विकास आघाडी

२०. मा. श्री कपिल पाटील. वि.प.स.. लोकभारती पक्ष

२१. मा. श्री विनय कोरे, वि.स.स., जनसुराज्य पक्ष

२२. मा. श्री महादेव जानकर, वि.प.स., राष्ट्रीय समाज पक्ष

२३. मा. श्री बच्चू कडू, वि.स.स., प्रहार जनशक्ती पक्ष

२४. मा. श्री राजू पाटील, वि.स.स., महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष

२५. मा. श्री रवी राणा, वि.स.स.

२६. मा. श्री विनोद निकोले वि.स.स. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष

२७. मा. श्री.छत्रपती संभाजीराजे भोसले, माजी राज्यसभा सदस्य, स्वराज्य संघटना

२८. मा. श्री प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी

२९. मा. श्री सदाभाऊ खोत, रयत क्रांती संघटना

३०. मा. श्री जोगेंद्र कवाडे, पीपल्स रिपब्लिकन पक्ष

३१. मा. श्री राजेंद्र गवई, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई)

३२. मा. श्री. गौतम सोनावणे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)

३३. मा. श्रीमती सुलेखाताई कुंभारे, बहुजन रिपब्लिकन एकता मंच

३४. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य

३५. अपर मुख्य सचिव (गृह), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई

३६. अपर मुख्य सचिव (महसूल), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई

३७. प्रधान सचिव, विधि व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई

३८. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई

विषय मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठक

महोदय/ महोदया,

मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणासंदर्भात सह्याद्री अतिथीगृह, मंत्रिमंडळ सभागृह, मलबार हिल, मुंबई येथे दिनांक १ नोव्हेंबर, २०१३ रोजी सकाळी १०.३० वाजता सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. सदर बैठकीस उपस्थित राहण्याबाबत आपणास विनंती करण्यात येत आहे.

आपला,

सु. ए. आंधळे, अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत

१. मा. उप मुख्यमंत्री तथा मंत्री गृह, विधी व न्याय यांचे सचिव

२. मा. उप मुख्यमंत्री तथा मंत्री वित्त व नियोजन यांचे प्रधान सचिव

३. मा. मंत्री, महसूल यांचे खाजगी सचिव.

४. मा. मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण यांचे खाजगी सचिव

१५. मा. मंत्री, ग्रामविकास व पंचायत राज यांचे खाजगी सचिव

६. मा. मंत्री, उद्योग यांचे खाजगी सचिव

७. मा. मंत्री, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) यांचे खाजगी सचिव

८. मा. मंत्री, राज्य उत्पादन शुल्क यांचे खाजगी सचिव

यांना विनंती करण्यात येते की, मा. मंत्री महोदयांना सदर बैठकी बाबतची सूचना अवगत करावी.

प्रत माहितीस्तव –

१. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव

१२. मा. उप मुख्यमंत्री तथा मंत्री गृह, विधी व न्याय यांचे खाजगी सचिव

३. मा. उप मुख्यमंत्री तथा मंत्री वित्त यांचे खाजगी सचिव

४. मा. मुख्य सचिव यांचे वरिष्ठ स्वीय सहायक

Back to top button
error: Content is protected !!