छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

सावधान बिग बॉस पाहत आहे..! छत्रपती संभाजीनगरातील रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर करडी नजर, फुटेज पाहून ४ हजारांचा दंड !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. १० -: शहरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून कचरा कुंड्या तसेच डिव्हाईडर व रस्त्यावरती कचरा आणून टाकणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवले जात आहे व कारवाई केली जात आहे. ज्युबली पार्क येथील एका मेडिकल चालकाने दुभाजकावर मेडिकल वेस्ट टाकल्याचे सीसीटीव्हीचे फुटेज पाहून सदर मेडिकल चालकास तातडीने ४ हजारांचा दंड करण्यात आला.

आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने स्मार्ट सिटी येथे अत्याधुनिक शहर स्वछता कंट्रोल रूम स्थापित केले आहे. या कंट्रोल रूमवरुन शहरभरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरेच्या मदतीने शहर स्वच्छ ठेवण्यास मदत होत आहे. घंटा गाडीत कचरा न टाकता इतररत्र कचरा टाकणाऱ्यांवर नजर ठेवण्यात येत आहे. सोबतच या कंट्रोल रूम वरून घंटा गाडी वेळेवर निर्धारित ठिकाणाहून कचरा संकलन करत आहे की नाही हेही ट्रॅक करण्यात येत आहे.

शुक्रवारी ज्युबिली पार्क येथील मेडिकलने दुभाजकवर मेडिकल वेस्ट आणून टाकले होते. ज्युबली पार्क चौकात लावलेल्या स्मार्ट सिटी येथील इंटीग्रेटेड कमांड अँड कंट्रोल रूम येथे असलेले स्वछता कंट्रोल रूमला कचरा टाकतानाचा लाईव्ह फुटेज मध्ये निरीक्षणात आले. सी. सी.टी.व्ही. कॅमेरा चेक करून किती वाजता कचरा टाकला व कोणी टाकला व कोणत्या मेडिकल वरून आला हे शोधून संबंधित घनकचरा विभाग पथकास कळवले.

सदरील मेडिकल धारकास 4000 हजार रुपयांचा दंड करण्यात आला. मनपा उपायुक्त सोमनाथ जाधव यांच्या निर्देशानुसार ही कार्यवाई स्वच्छता निरीक्षक उमाकांत गोदे, आशिष शिंदे व नागरिक मित्रा पथकचे परदेशी, गवली यांनी केली. सुयोग शिरसाठ व विशाल खरात यांनी कंट्रोल रूममध्ये मदत केली.

Back to top button
error: Content is protected !!