सिल्लोड येथे अल्पसंख्याक समाजातील लाभार्थ्यांसाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन
मुंबई, दि. ८ : अल्पसंख्याक विकास विभागाच्या अंतर्गत असलेले मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांच्या वतीने सिल्लोड येथे शनिवार दि.९ व रविवार दि.१० डिसेंबर २०२३ रोजी अल्पसंख्याक समाजातील गरजू लाभार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचा लाभ अल्पसंख्याक समाजातील गरजू लाभार्थ्यांनी घ्यावा,असे आवाहन अल्पसंख्यांक विकास व औकाफ, पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे.
अल्पसंख्याक समाजातील होतकरू, गरजू लाभार्थ्यांना महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेता यावा यासाठी या कार्यशाळेतून माहिती देण्यात येणार आहे. तसेच आवश्यक अर्थसहाय्यासाठी कर्जासंदर्भातील अर्ज भरुन घेण्यात येणार आहे. या सर्व सुविधा या कार्यशाळेत एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. ही कार्यशाळा शनिवार दि.९ व रविवार दि.१० डिसेंबर २०२३ रोजी नॅशनल उर्दू हायस्कूल मैदान, जमालशाह कॉलनी, सिल्लोड, जिल्हा-छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे, अशी माहिती मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक लालमियाँ शेख यांनी दिली आहे.
या योजनेचा लाभ राज्यातील सर्व अल्पसंख्यांक समाजातील सुशिक्षित बेरोजगार, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, तसेच उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी- विद्यार्थिनी व बचत गटांनाही घेता येईल. सर्व अल्पसंख्याक समाजातील गरजू लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अल्पसंख्यांक विकास व औकाफ, पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe