छत्रपती संभाजीनगरटॉप न्यूज
Trending

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! निवृत्तीदिवशीच मिळणार चार लाखांचा धनादेश !!

’रजा रोखीकरण’ची रक्कम दुप्पट, व्यवस्थापन परिषदेचा निर्णय, या महिन्यात चार कर्मचा-यांना लाभ मिळणार

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि.२६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षकेत्तार कर्मचा-यांना निवृत्तीच्या वेळी देण्यात येणारी रजा रोखीकरणाची रक्कम दोन वरुन चार लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जुलै अखेरीस निवृत्त होणा-या चार कर्मचा-यांना याचा लाभ होणार आहे.

शिक्षकेत्तर कर्मचारी, अधिकारी यांना सेवानिवृत्तीच्या वेळी जास्तीत जास्त ३०० दिवसांच्या शिल्लक रजांची रोख रक्कम देण्यात येते. यापुर्वी कर्मचा-यांना दोन लाख रुपयांचा निधी निवृत्तीच्या दिवशी मिळत असे. या संदर्भात मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली ८ जुलै रोजी झालेल्या बैठकीत सदर रक्कम चार लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला.

तर चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांची संपूर्ण रक्कम शंभर टक्के देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. जुलै अखेरीस डॉ.दिगबंर नेटके उपकुसचिव, डी.एस.बनकर प्रयोगशाळा तंत्रज्ञ, अरविंद हेलवाडे वरिष्ठ सहाय्यक, परीक्षा विभाग, व गणेश साळवे शिपाई हे चार कर्मचारी निवृत्त होत आहेत. या कर्मचा-यांना रजा रोखीकरण योजनेचा लाभ होणार आहे. तसेच जीवरसायन शास्त्र विभागातील डॉ.विकास शेंडे हे ही सेवानिवृत्त होणार आहेत.

सेवा गौरव समारंभ
जुलै अखेरीस सेवानिवृत्त होण-या या सर्वांचा सेवा गौर सोहळा येत्या बुधवारी दि.३१ सकाळी ११ वाजता महात्मा फुले सभागृहात होणार आहे. कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल. यावेळी प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी डॉ.कैलास पाथ्रीकर आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

Back to top button
error: Content is protected !!