महिलेचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामीची धमकी ! हॉटेलवर बोलावून केले हे कृत्य !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २८ – महिलेचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामीची धमकी दिली. तिच्या मुलाला किडनॅप करण्याचेही धमकावले. त्यानंतर हॉटेलवर बोलावून तिच्या इच्छेविरुद्ध शरीर संबंध केल्याचे नमूद करण्यात आले आहे.
शाहरुख शेख (रा. आमेर नगर, बजाज हॉस्पिटलच्या मागे, छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. यातील फिर्यादी या आरोपीचे वडीलांचे नावावर असलेला गाळा किरायाणे घेवून मेस चालवित होत्या व आरोपीस डब्बा देण्यासाठी आरोपीचे घरी गेल्या असता यातील आरोपीने फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध तिचे सोबत शरिर संबध करून फिर्यादीचे फोटो काढले. मी सांगितले तेव्हा मला भेटायला यायचे नाहीतर मी तुझे फोटो फेसबुकवर व्हायरल करून बदनामी करण्याची तसेच मुलांना किडनॅप करण्याची धमकी दिली.
त्यानंतर मे 2024 मध्ये हॉटेलवर बोलवून धमकी देवून फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध तिचेसोबत शरीर संबध केले. यातील आरोपीने फिर्यादीच्या फोनवर फोन करून बोलावून घेवून मोबाईल मधिल ब्लॉक केलेला आरोपीचा नंबर काढ म्हणून शिवीगाळ करून हाताचापटाणे मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
याप्रकरणी सदर महिलेच्या फिर्यादीवरून सातारा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोउपनि कामठे करीत आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe