प्रमसंबंधातून मुलीला टॉर्चर केले, मृतदेह सलिम अली सरोवरमध्ये आढळला ! जात वेगवेगळी असल्याने लग्नास नकार !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २३ – प्रमसंबंधातून मुलीला टॉर्चर केले. जात वेगवेगळी असल्याने मुलाने लग्नास नकार दिला मात्र त्यानंतरही संपर्क व संवाद सुरुच ठेवला. दरम्यान, मुलीचा मृतदेह सलिम अली सरोवरमध्ये आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
किरण कांबळे (रा. टीव्ही सेंटर परिसर, छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. यासंदर्भात मृत मुलीच्या आईने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, त्यांची 21 वर्षीय मुलगी संगमनेर येथे BAMS च्या दुस-या वर्षात शिक्षण घेत होती. दि. 17/08/2024 रोजी शनिवारी रक्षा बंधनसाठी ती घरी आली होती. दि. 20/08/2024 रोजी 11- 00 ते 11-30 वाजेच्या दरम्यान ती आईला सांगून गेली की, मी माझ्या मैत्रीणीकडे चालले आहे. त्यानंतर एक दीड वाजेच्या सुमारास तिच्या मैत्रिणीचा फिर्यादी महिलेस फोन आला व तिने सांगितले की, त्यांची मुलगी, मैत्रिण आणि मित्र किरण कांबळे असे निरालाबाजार येथे असताना त्यांची मुलगी व किरण काबंळे यांचा एकमेकासोबत वाद झाला असून त्यांची मुलगी व तिची मैत्रिण SB कॉलेज जवळ थांबल्या असून ती ही खुप चिडचिड करीत आहे. तुम्ही तिला येथे येऊन घेवून जा.
त्यावरुन आईने तिला फोन करून विचारणा केली असता तिने सांगितले की, मी मैत्रिणीसोबत असून मी थोड थांबून घरी येते. त्यानंतर आईने वारंवार फोन केला असता तिने फोन उचलला नाही. त्यानंतर आईने तिच्या मेत्रिणीला फोन केला असता तिने सांगितले की, मी घरी आले असून त्यांची मुलगी SB कॉलेजच्या पाकींग मध्ये बसलेली आहे. त्यानंतर आईने SB कॉलेजची पार्किंग गाठली मात्र, त्यांची मुलगी मिळून आली नाही.
फोनही केला परंतु फोन उचलत नव्हती. नंतर फोन बंद झाला. त्यानंतर ती ही मिळून येत नसल्याने तक्रार देण्या करीता आई पोलिस स्टेशन छावणी येथे पोहोचली. त्या ठिकाणी पोउपनि जगदाळे यांना भेटून हकीगत सांगितली असता त्यांनी मुलीच्या मोबाईलचे लोकेशन घेतले असता तिचे लास्ट लोकेशन सलीम अली सरोवरच्या पाठीमागे रोजबाग परिसर येथे दिसून आले. तेथे तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. त्यानंतर छावणी पोलिसांत मिसिंग दाखल केली.
दरम्यान दि.22/08/2024 रोजी संध्याकाळी पोलिसांकडून माहिती मिळाली की, सदर मुलीच्या वर्णना प्रमाणे पोलीस ठाणे सिटीचौक हद्दीतील सलीम अली सरोवरातून एका मुलीचा मृतदेह मिळून आला असून तो घाटी दवाखाना येथे आहे. आपण सदर ठिकाणी जाऊन खात्री करावी. त्यानुसार नातेवाईकांनी पाहणी केली असता तो मृतदेह सदर मुलीचाच असल्याची खात्री केली.
आईने दिलेल्या फिर्यादीनुसार सदर मुलीचे मागील काही दिवसांपासून किरण कांबळे याच्या सोबत प्रेमसंबंध होते. याबाबत सदर मुलीने दोन महिन्यांपूर्वी सांगितले होते की. आमचे दोघांचे एकमेकावर प्रेम आहे. त्यावरून मुलीच्या आईने सदर मुलाला त्याबाबत विचारले असता त्याने पण तेच सांगितले. मुलीच्या आईने त्यास तुम्ही दोघे लग्न करणार आहे का असे विचारले असता त्याने सांगीतले की, माझी व तुमची जात वेगळी आहे. त्यामुळे मी लग्न करु शकत नाही. तेव्हा मुलीच्या आईने त्यास सांगितले की, तुला लग्न करायचे नसेल तर माझ्या मुलीसोबत कसलाही संबंध ठेऊ नको तीही तुझ्या सोबत बोलणार नाही.
तरीही किरण कांबळेने मुलीसोबत वारंवार संपर्क करून सवांद केला. मुलीने त्यास स्पष्ट शब्दात सांगितले की, माझे सोबत पुन्हा संपर्क करू नको. तरीही तो तिला तीच्या बद्दल त्याच्याकडे तिचे वैक्तीक काही अक्षेपार्ह गोष्टी असल्याचे सांगून तिला टॉर्चर करत आहे, असे मुलीने तिच्या आईला सांगितल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर दि. 20/08/2024 रोजी किरण कांबळेने मुलीला बोलावून घेतले व तिस अक्षेपार्ह गोष्टी वरून त्रास दिल्याने तिला तो सहन न झाल्याने किरण कांबळेच्या त्रासाला कंटाळून त्याने तिला स्वतःच्या जीवाचे बरेवाईट करण्यास परावृत्त केल्याने तिने तिच्या जिवाचे बरेवाईट केले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी मृत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून किरण कांबळे याच्या विरुध्द सिटीचौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe