छत्रपती संभाजीनगरटॉप न्यूजमहाराष्ट्र
Trending

जुन्या पेन्शनसाठी पुकारण्यात आलेल्या संपास महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचा जाहीर पाठिंबा !

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २४- जुन्या पेन्शनसाठी पुकारण्यात आलेल्या संपास महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीने पाठिंबा जाहीर केला आहे. महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती शिक्षक संघटना, मुंबई यांनी जुन्या पेन्शन योजनेसाठी व शिक्षकाच्या इतर प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी 29 ऑगस्ट 2024 पासून सर्व शिक्षक संपावर जात असल्याचा इशारा महाराष्ट्र शासनास दिलेला आहे.

राज्यातील शिक्षकांचे विविध प्रकारचे प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक व्हावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी, खाजगीकरण थांबवावे, 20 पट असलेल्या शाळा बंद करण्यात येऊ नये, सर्व रिक्त पदे पदोन्नती ने व नवीन भरतीने भरण्यात यावी, महागाई भत्ता थकबाकी तात्काळ देण्यात यावी, आठवा वेतन आयोग लागू करण्यासाठी तात्काळ समितीचे गठन व्हावे आशा विविध मागण्यासाठी  या संपास महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे.

महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संपात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन राज्याध्यक्ष शिवाजीराव साखरे वाघ, संस्थापक दिलीपराव ढाकणे, राज्य सरचिटणीस अंजुम पठाण, शिक्षक नेते अंकुश काळे, राज्य नेते रामदास सांगळे,के सी गाडेकर, माधव लातूरे ,शंकरराव मनमाडकर,आबा काशीद, बाबा कपिले, भिवाजी कांबळे, जयाजी भोसले, राजेंद्र नवले, राज्य महिला नेत्या मुक्ता पवार, राज्य महिला अध्यक्ष सुषमा राऊतमारे, राज्य महिला कार्याध्यक्ष ज्योती मूरकीकर, उपाध्यक्ष गिरीश नाईकडे, चंदू घोडके,  सहसचिव अनिल मूलकलवार, कार्याध्यक्ष रवींद्र अंभोरे, कोषाध्यक्ष लक्ष्मण काटकर, प्रसिद्धीप्रमुख जगत घुगे, राज्य संपर्कप्रमुख संतोष बरबंडे, राज्य संघटक शरद पाटील, बाळासाहेब महाडिक भीमाशंकर जमादार, उत्तम पवार, संतोष माठे, कार्यालयीन चिटणीस रामकिसन लटपटे, राज्य प्रवक्ते संजीव देवरे यांनी केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!