वडगाव कोल्हाटीतील 8 जणांवर वीजचोरीचा गुन्हा दाखल ! आजूबाजूच्या गावांतील वीज चोरांचे धाबे दणाणले !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ७ : महावितरणच्या वाळूज महानगर शाखेने सप्टेंबर महिन्यात 1 लाख 37 हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली होती. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात एकाच गावांतील आठ जणांवर वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी वडगाव कोल्हाटी येथील रहिवासी आहेत.
महावितरणच्या धडक मोहीमेत गावातील अनेक ठिकाणी घरगुती व व्यावसायिक वापरासाठी लघुदाब विद्युत वाहिनीवर आकडे टाकून चोरी केल्याचे प्रकार उघड झाले होते. महावितरणचे सहायक अभियंता गोविंद दुसंगे यांच्या फिर्यादीवरून भारतीय विद्युत अधिनियम कायद्याच्या कलम १३५ नुसार छावणी पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हे दाखल करण्यात आले.
आरोपींत कमलाकर बद्रीनारायण काळे, आकाश अशोक फिरके, अंकुश रामभाऊ सकुंडे, अण्णासाहेब सोपान डोईफोडे, गोकुळ फुलसिंग राठोड, सतीश रामेश्वर लांबटे, रोहिदास साहेबराव बोरसे व उद्धव वाल्मिक पाटील (सर्व रा.वडगाव कोल्हाटी) यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe