छत्रपती संभाजीनगरात कर थकवणाऱ्या ३३ मालमत्ता धारकांवर जप्ती कारवाईचा बडगा, उद्याही धडाका सुरू राहणार !
मालमत्ता कर भरण्यासाठी वार्ड कार्यालय सुरू राहणार
संभाजीनगर लाईव्ह, दि.३० डिसेंबर – मालमत्ता कर थकवणार्यांविरोधात महानगरपालिकेने मोहीम हाती घेतली आहे. आज ३३ मालमत्ता धारकांवर कारवाई करण्यात आली.
महानरपालिकेच्या वतीने शहरातील सर्व नऊ झोन कार्यालय अंतर्गत रहिवासी व व्यवसायिक मालमत्ता व पाणी पट्टी नियमित भरणा करण्यासाठी सतत नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. थकीत मालमत्ता कर व पाणी पट्टी बाबत पालिकेच्या वतीने सबधितांना नोटिसा देखील देण्यात आल्या आहेत.
आज, ३० डिसेंबर रोजी प्रशासक यांच्या आदेशानुसार झोन न १ ते ०९ अंतर्गत एकूण ३३ मालमत्ता धारकाकडून थकीत मालमत्ता कर व पाणी पट्टी वसुली ची कारवाई करण्यात आली. यात व्यवसायिक मालमत्ता – वाईन शॉप, हॉटेल इत्यादी मालमत्ताचा समावेश आहे.
सदरील कारवाई उद्या, रविवारीही सुरू राहणार असून थकीत मालमत्ता कर व पाणी पट्टी भरणा करण्यासाठी सर्व वार्ड कार्यालय उद्या सुरू राहणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe