छत्रपती संभाजीनगर
Trending

Truecallerवर फौजदार असे भासवून छत्रपती संभाजीनगर शहरातील दुकानदारांना गंडवणारा अट्टल आरोपी जेरबंद !

संभाजीनगर लाईव्ह, दि. १७- फोजदार असल्याचं सांगून अनेकांची फसवणुक करणारा तसेच चोरी करणारा अट्टल आरोपीस पुंडलिकनगर पोलीसांनी जेरबंद केले. Truecallerवर पि.एस.आय. शिंदे पोलिस स्टेशन एम.वाळूज असे भासवून दुकानदारांची फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून बॅटरी, इन्व्हर्टर ड्रिल मशीन, केबल वायर बंडल, प्लंबींगचे सामान, डोर फिटींगचे सामान जप्त केले आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहरातील दुकानदारांनी भूल थापांना बळी पडू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पुंडलिकनगर पोलिस स्टेशन विशेष पथकाचे प्रमुख स.पो.नि. शेषराव खटाणे पोना डोईफोडे,मान्टे, पारधे, पोअं जाधव, कांबळे, यदमळ, निकम, बीडकर हे पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करत असतांना गुप्त बातमीराच्या मार्फतीने माहिती मिळाली की, पो.स्टे. पुंडलिकनगर येथे दाखल गुन्ह्यातील चोरी केलेला आरोपी हा गजानन नगर मळ्यात येणार आहे.

ही खात्रीलायक माहिती मिळाल्याने स.पो.नि. खटाणे व सोबतच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन गुन्ह्यातील माल विक्री करण्याच्या उद्देशाने आलेला आरोपी ज्ञानेश्वर नारायण देशमुख (वय 36 वर्ष रा. पुंडलिकनगर, छत्रपती संभाजीनगर) यास ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्याने पो. स्टेपुंडलिकनगर येथे दाखल दाखल गुन्ह्यातील फिर्यादी यांना फौजदार असल्याचे तसेच त्यांच्या मोबाईल मधील Truciallerवर पि.एस.आय. शिंदे पोलीस स्टेशन एम.वाळूज असे नाव भासवून त्यांच्या कडुन 41,500/- रुपये किमतीचे बॅटरी व इन्व्हर्टर बिल पाठवून देतो असे सांगून फसवणूक केल्याचे सांगितले.

तसेच शहरातील पोलिस स्टेशन सिटीचौक, पोलिस स्टेशन सिडको, पोलिस स्टेशन सातारा हद्दीमध्ये त्याने इलेक्ट्रीकल, हार्डवेअर, कलर आदी दुकानदार यांना त्यांच्या मोबाईलमधील Truecallerवर पि.एस.आय. शिंदे पोलीस स्टेशन एम. वाळूज असे नाव भासवून फसवणूक केली असल्याचे सांगितले. त्याच्या ताब्यातून किमती बॅटरी, इन्व्हर्टर ड्रिल मशीन, केबल वायर बंडल, प्लंबींगचे सामान, डोर फिटींगचे सामान असे एकून 20,4072/- रु. किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

ही कामगीरी पोलीस आयुक्त मनोज लोहीया, पोलीस उप आयुक्त परिमंडळ – शिलवंत नांदेडकर,सहाय्यक पोलीस आयुक्त (उस्मानपुरा विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली राजश्री आडे पोलीस निरीक्षक पो स्टे पुंडलिकनगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव खटाणे, पोउपनि मेघा माळी, पोना डोईफोडे, मान्टे, पारधे, देशमुख, पो. अ. जाधव, कांबळे, यदमळ, निकम, बीडकर यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!