देश\विदेशमहाराष्ट्र

अभिनेत्री दिशा पटानी पुन्हा प्रेमात? हा विदेशी तरुण नक्की आहे कोण जाणून घेऊ…

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटाणी अभिनयापेक्षा इतर कारनामे आणि वादांनीच चर्चेत असते. कधी तिचे नाव एखाद्या राजकारण्यासोबत जोडले जाते, तर कधी बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफसोबत. टायगरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सध्या ती एका विदेशी व्यक्‍तीसोबत फिरताना दिसत आहे. दोघे डेट करत आहेत का, अशी चर्चा त्‍यामुळे सुरू झाली आहे.

मोजक्या चित्रपटांत आजवर दिशा पटानी दिसून आली आहे. सध्या ती ज्या व्यक्तीबरोबर सातत्याने दिसतेय ती आहे अलेक्झांडर अॅलेक्स. हा तिचा जिम ट्रेनर व मित्र आहे. अलेक्झांडर मूळचा सैबेरियाचा आहे, गेली ७ वर्षे तो मुंबईत राहत आहे.

दोघांच्या नात्‍याबद्दल चर्चा सुरू झाली तेव्हा अलेक्‍झांडरने प्रतिक्रिया दिली असून, तो म्हणाला, की काही आठवड्यांपासून लोक आमच्या वैयक्तिक जीवनाबद्दल काहीतरी दुसरेच बोलत आहेत. त्यांना सत्य काय माहीत आहे? मला कळत नाही की आमच्या आयुष्यात ढवळाढवळ करून लोक काय मिळवत असतील? आम्हाला शांततेत का राहू दिले जात नाही?, असे अलेक्‍झांडर म्हणाला. दिशाबद्दल तो म्हणाला, की २०१५ साली आम्ही एकत्र राहत होतो. मी, दिशा आणि आमचे इतर मॉडेल मित्र एकत्र रूम शेअर करायचो.

आम्ही दोघेही फिटनेसबाबत खूपच काळजी घेत असतो. त्यामुळेच आमची मैत्री घट्ट आहे. आम्ही एकत्र जिमला जाऊ लागलो होतो. दुपारचे आणि रात्रीचे जेवण एकत्र करायचो. त्या घरात आम्ही खूप वेळ एकत्र घालवला. त्यामुळेच घट्ट मित्र झालो.

दिशा माझ्यासाठी कुटुंबासारखी असल्याचेही तो म्हणाला. दिशा पटानी यापूर्वी एक व्हिलन २ मध्ये दिसली होती. या चित्रपटात अर्जुन कपूर आणि जॉन अब्राहम तिचे सहकलाकार होते. आता लवकरच ती ‘योद्धा’ आणि ‘किक २’ या चित्रपटांत दिसणार आहे.

Back to top button
error: Content is protected !!