छत्रपती संभाजीनगरटॉप न्यूजपैठण
Trending

पैठण येथील संतपीठात पाचव्या बॅचसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु ! आजपर्यंत चार बॅचमध्ये 500 जणांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण !!

छत्रपती संभाजीनगर,दि.२२ : डॉ.बाबासाहेब आंबडेकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित पैठण येथील संतपीठात पाचव्या बॅचसाठी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात पाच प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु असल्याची माहिती समन्वयक डॉ.प्रवीण वक्ते यांनी दिली.

संतपीठ श्रीक्षेत्र पैठण येथील शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी पाचवी बॅच सुरु होत आहे. कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली संतपीठ कार्यरत आहे. आजपर्यंत चार बॅचमध्ये ५०० जणांनी प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला आहे . या बॅचच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झालेली असून या संदर्भातील संपूर्ण विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रमांची माहिती व अर्ज हे विद्यापीठाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

या प्रवेश प्रक्रियेत १. श्री तुकाराम गाथा ग्रंथ परिचय प्रमाणपत्र अभ्यासक्रम, २. श्री.एकनाथी भागवत ग्रंथ परिचय प्रमाणपत्र अभ्यासक्रम ३. श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ परिचय प्रमाणपत्र अभ्यासक्रम ४. वारकरी संप्रदाय परिचय प्रमाणपत्र अभ्यासक्रम ५. महानुभाव संप्रदाय परिचय प्रमाणपत्र अभ्यासक्रम या विषयात प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविले जातात व आजतागायत येथे चार बॅच यशस्वीपणे उत्तीर्ण झाल्या आहेत.

संतसाहित्यातून आध्यात्मिक गती प्राप्त करुन घेण्यात हे विद्यार्थी यशस्वी झालेले आहे. गेल्या चार बॅचमध्ये पदवी, पदव्यूत्तर विद्यार्थी संशोधनासमवेत विविध क्षेत्रातील मान्यवर अध्यात्मिक आवड असलेल्यांनाही प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत, अशी माहिती समन्वयक डॉ.प्रवीण वक्ते यांनी दिली.

Back to top button
error: Content is protected !!