खुलताबाद व औरंगाबाद पंचायत समितीचे कृषी अधिकारी खेडकर चार हजारांची लाच घेताना चतुर्भुज !
संभाजीनगर लाईव्ह, दि. ३ – कृषी दुकानाचा मासिक तपासणीचा अनुकूल अहवाल कृषी अधीक्षक यांना पाठवण्यासाठी तक्रारदाराकडून ४ हजारांची लाच घेताना खुलताबाद पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांना रंगेहात पकडण्यात आले. औरंगाबाद पंचायत समितीचाही अतिरिक्त पदभार त्यांच्याकडे आहे.
अशोक रघुनाथ खेडकर (वय 50 वर्षे, व्यवसाय- नोकरी, पद -कृषी अधिकारी वर्ग (2) नेमणूक- खुलताबाद पंचायत समिती, अतिरिक्त पदभार औरंगाबाद पंचायत समिती, जि. औरंगाबाद. असे आरोपीचे नाव आहे.
यातील तक्रारदार यांचे कृषी सेवा केंद्राचा मासिक हप्ता व कृषी दुकानाचा मासिक तपासणीचा अनुकूल अहवाल कृषी अधीक्षक यांना पाठवण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 5,000/-रुपये पंचासमक्ष लाचेची मागणी करून तडजोडीअंती 4,000/- रुपये पंचासमक्ष स्वीकारले. दिनांक 09/01/2023 रोजी त्यांनी लाच मागितली होती. त्यानुसार दि. 03/02/2023 रोजी त्यांनी लाच स्वीकारली.
ही कारवाई संदिप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद, विशाल खांबे अपर पोलीस अधीक्षक, मारुती पंडित, पोलिस उप अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी – नंदकिशोर क्षीरसागर,पोलीस निरीक्षक, सहाय्यक अधिकारी – हनुमंत वारे, पोलीस निरीक्षक, सापळा पथक – पोअं/थोरात, तोडकर, नागरगोजे, चालक पोअं/शिंदे यांनी पार पाडली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe