महाराष्ट्र
Trending

अहमदपूर बाजार समितीच्या मतमोजणीला गालबोट ! निवडणूक निर्णय अधिकाऱ्यास धक्काबुक्की, माजी आमदाराच्या कार्यकर्त्याने टेबलाला लाथ मारली !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १ – तुम्ही निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पाडली नाही. पेट्या बदल करून ठेवल्या असे आरोप करून निवडणूक निर्णय अधिकारी यांना धक्काबुक्की करून टेबलाला लाथ मारली. यामुळे मतमोजणीची कागदपत्रे खाली पडली. या प्रकारामुळे काही काळ मतमोजणी प्रक्रिया थांबली होती. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला व मतमोजणी प्रक्रिया पार पडली. अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीदरम्यान जिल्हा परिषदेच्या शाळेत हा प्रकार घडला. याप्रकरणी माजी आमदारासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसंत विष्णू घूले (वय 54 वर्षे व्यवसाय नोकरी सहायक निबंधक स. संस्था अहमदपूर रा. वाशी ता. वाशी जि. उस्मानाबाद) यांनी पोलिसांना दिलेली प्राथमिक माहिती अशी की, सहकारी संस्था , अहमदपूर येथे मागील पाच वर्षांपासून सहायक निबंधक या पदावर कार्यरत आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पूणे यांच्या आदेशान्वये कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदूपरची निवडणूक घेण्यासाठी वसंत विष्णू घूले यांना निवडणूक निर्णय आधिकारी म्हणून नियुक्त केले. निवडणूक निर्णय अधिकारी वसंत विष्णू घूले यांच्या सोबत निवडणुक प्रक्रियेत मदतीस सहकार अधिकारी एन एस किलचे हे होते.

दि. 30/04/2023 रोजी जि.प.शाळा, अहमदपूर येथे सकाळी 08.00 वाजेपासून सायंकाळी 04.00 वाजे पर्यंत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. त्यानंतर 04.45 वाजता मतमोजणीला सुरवात झाली. त्या दरम्यान रात्री 08.00 वाजेच्या सुमारास मतमोजणी चालू असताना निवडणूक निर्णय अधिकारी वसंत विष्णू घूले व किलचे हे मतमोजनी कक्षाबाहेर नेमलेल्या कामकाजासाठी बसून काम करत असताना माजी आमदार विनायकराव पाटील (रा. काळेगाव ता. अहमदपूर) व त्यांचेसोबत बालाजी गुट्टे, कल्याण बदने व त्याचेसोबत एक अनोळखी यांनी मतमोजणी केंद्राजवळ निवडणूक निर्णय अधिकारी वसंत विष्णू घूले यांच्या परवानगीशिवाय प्रवेश केला.

तुम्ही निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पाडली नाही असे म्हणून दमदाटी करून त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी वसंत विष्णू घूले यांना धकाबूकी केली. बालाजी गुटटे याने टेबलास लाथ मारून टेबल पाडला. त्यामुळे मतमोजणीचे कागदपत्र खाली पडले. निवडणूक निर्णय अधिकारी वसंत विष्णू घूले हे करीत असलेल्या सरकारी कामात त्यांनी अडथळा नर्माण केला.

त्यामूळे मतमोजणी प्रक्रिया थोडा वेळ स्थगित झाली होती. बालाजी गुटटे व कल्याण बदने यांनी विनायक पाटील यांना सांगितल्यामुळे विनायकराव पाटील यांनी मला तू निवडणुक प्रक्रिया व्यवस्थित केली नाहीस. पेट्या बदल करून ठेवल्या असे म्हणून दमदाटी केली. त्यांना पोलिसांनी बाहेर काढल्यानंतर मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पूर्ण करण्यात आली.

याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी वसंत विष्णू घूले यांनी दिलेल्या तक्रारीवरून माजी आमदार विनायकराव पाटील, बालाजी गुट्टे, कल्याण बदने व एका अनोळखीवर अहमदपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!