अंबड पोलिस स्टेशनचा पोलिस २ हजारांची लाच घेताना जाळ्यात ! अंबड रोड, जालन्यातील कारवाईने खाकीतील लाचखोरांमध्ये भरली धडकी !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. २६ – अदखलपात्र गुन्ह्यात प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी २ हजारांची लाच घेताना अंबड पोलिस स्टेशनचे पोलिस हेड कॉन्स्टेबलला लाच घेताना पकडले. अंबड रोड, जालना येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात हा पोलिस अलगद अडकला. महादु अप्पाराव पवार (वय 56 वर्षे, पद – पोहेकाॅ, वर्ग-3, पोलिस ठाणे अंबड, जि. जालना) असे आरोपीचे नाव आहे.
यातील तक्रारदार यांचेविरूध्द दि. 20/07/2023 रोजी पोलीस ठाणे अंबड (जि जालना) येथे दाखल अदखलपात्र गुन्ह्यात त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी यातील आरोपी महादु अप्पाराव पवार यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांना दि. 26.07.2023 रोजी 2,000/- रुपये लाचेची मागणी केली. लाचेची रक्कम 2,000/- रुपये पंचासमक्ष अंबड रोड, जालना येथे स्वीकारताना आरोपी महादु अप्पाराव पवार यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचेविरूध्द पोलीस ठाणे तालुका जालना येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पर्यवेक्षण अधिकारी:-* किरण बिडवे,पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्यूरो, जालना, सापळा अधिकारी:- पोलिस निरीक्षक शंकर म. मुटेकर, सापळा पथक – गजानन कांबळे, जावेद शेख, विठ्ठल कापसे यांनी पार पडली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe