छत्रपती संभाजीनगर
Trending

अंगणवाडी, ग्राम पंचायतीमध्ये ‘सुकन्या समृद्धी योजनेत’ खाते उघडण्यासाठी प्रबोधन !

जाणून घ्या योजनेचे ठळक वैशिष्टये

Story Highlights
  • 9 व 10 फेब्रुवारी 2023 रोजी विशेष अभियान

संभाजीनगर लाईव्ह, दिनांक 03 -: मुलींचे शिक्षण व उज्वल भवितव्यासाठी सुकन्या समृद्धी योजना महत्वाची आहे. याबाबत डाक कर्मचारी, ग्राम पंचायत, अंगणवाडी व बाल विकास प्रकल्प अधिकारी या विविध घटकांमध्ये सदरील योजनेचे प्रबोधन करुन 9 व 10 फेब्रुवारी 2023 रोजी विशेष अभियाना दरम्यान संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये सुकन्या समृद्ध योजनेचे खाते उघडण्यात येणार आहेत.

योजनेचे ठळक वैशिष्टये –

  • आकर्षक व्याजदर. 7.6 टक्के (दि.01.01.2023 पासून लागू)
  • मुलीचे वय वर्ष 10 पर्यन्त नैसर्गिक किंवा कायदेशीर पालक खाते उघडू शकतात.
  • फक्त रु. 250/- भरुन खाते उघडता येते. पुढील जमा रुपये 50/- च्या पटीत.
  • खाते उघडल्यापासून पुढील 15 वर्षांपर्यंत खात्यात दरमहा बचत करावी  लागते. कमीत कमी 250/- व जास्तीत जास्त 1 लक्ष 50 हजार पर्यंत एक आर्थिक वर्षात भरणा करता येतो.

 

  • मुलगी 18 वर्षांची झाल्यावर, बारावी उत्तीर्ण झाल्यावर किंवा मुलीचे लग्न जमल्यानंतर जमा रकमेतून 50 टक्के रक्कम काढता येते.
  • खात्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर खात्यातील एकूण रक्कम व्याजासहित काढून ते खाते बंद करता येते.
  • प्राप्तीकरात कलम 80 सी नुसार सूट मिळते.

आवश्यक कागदपत्रे :-

  1. मुलीचे जन्म प्रमाण पत्र.
  2. मुलीचे आधारकार्ड, पालकाचे आधारकार्ड व PAN कार्ड.
  3. मुलीचे व पालकांचे  प्रत्येक 02 फोटो व रहिवासी पुराव्यासाठी आवश्यक कागद पत्रे ई.

 

औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व डाकघरे आणि शाखा डाकघरे हे जनतेला सेवा देण्यासाठी सदैव अग्रेसर आहेत. तरी सर्व जनतेने  आपल्या आर्थिक प्रगतीस हातभार लावण्यासाठी व आपल्या कन्येचे भविष्य उज्ज्वल बनविण्यासाठी पोस्ट ऑफिस मधील सुकन्या समृद्धी योजना खात्यामध्ये 9 व 10 फेब्रुवारी 2023 रोजी जास्तीत जास्त गुंतवणूक करुन लाभ घ्यावा, असे आवाहन अधिक्षक डाकघर ए.के. धनवडे, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद यांनी केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!