छत्रपती संभाजीनगर
Trending

हायकोर्टाचा दणका: पाच वर्षांपासून बंद असलेल्या सुपरस्पेशलिटी रुग्णालयात अखेर शस्त्रक्रिया सुरु ! १३६ अँजिओग्राफी, ३ अँजिओप्लास्टीसह विविध शस्त्रक्रिया; गरीबांना मिळू लागल्या दर्जेदार वैद्यकीय सेवा !!

खासदार जलील याचिकेची दखल :

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ९ -: मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जनहित याचिकेद्वारे दिलेल्या आदेशानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. सुपर स्पेशलिटी रुग्णालयात अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी व र्‍हदयरोग संबंधी विविध शस्त्रक्रिया सुरु झाल्या आहे. सुपर स्पेशलिटी रुग्णालयात १० नर्सिंग स्टाफची नियुक्ती, तसेच आतापर्यंत १३६ अँजिओग्राफी, ३ अँजिओप्लास्टी, २३३२ हेमोडायलेसीस व ३१६२ एमआरआर व इतर शस्त्रक्रिया झाल्याचे घाटी रुग्णालयाचे अधिष्ठता यांनी उच्च न्यायालयात माहिती दिली.

खासदार इम्तियाज जलील यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या मागील सुनावणीवेळी मा.उच्च न्यायालयाने अ‍ॅड. सुजीत कार्लेकर व खासदार इम्तियाज जलील पथकास घाटी रुग्णालयाची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. तसेच दीडशे कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले सुपरस्पेशलिटी रुग्णालय व त्याठिकाणी असलेल्या अद्यावत यंत्रसामुग्री मागील पाच वर्षांपासून बंद असल्याचेही खासदार इम्तियाज जलील यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिले होते.

त्याअनुषंगाने सुपर स्पेशलिटी रुग्णालयात त्वरीत पदभरती करून विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया सुरु करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करून घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी घाटी रुग्णालयात केलेल्या कामाची आणि सुपरस्पेशलिटी रुग्णालय कार्यान्वित करून दिलेल्या वैद्यकिय सेवेची लेखी माहिती उच्च न्यायालयात सादर केली.

खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रयत्नाने कार्यान्वित झालेल्या सुपर स्पेशलिटी रुग्णालयात अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी व र्‍हदयरोग संबंधी विविध शस्त्रक्रीया सुरु झाले आहे. सुपर स्पेशलिटी रुग्णालयात १० नर्सिंग स्टाफची नियुक्ती, तसेच आतापर्यंत १३६ अँजिओग्राफी, ३ अँजिओप्लास्टी, २३३२ हेमोडायलेसीस व ३१६२ एमआरआर व इतर शस्त्रक्रिया झाल्याचे घाटी रुग्णालयाचे अधिष्ठता यांनी उच्च न्यायालयात माहिती दिली.

तसेच कार्डिओलॉजी, न्युरोलॉजी, उरोलॉजी, सीवीटीएस, न्युरोसर्जरी, न्युनोथॉलॉजी, प्लास्टीक सर्जरी आणि नेफरोलॉजी यासह इतर सर्व विभागाची बाह्यरुग्ण सेवा सुरु करण्यात आल्याची माहिती सुध्दा मा.उच्च न्यायालयात अधिष्ठता यांनी दिली. पुढील सुनावणी ५ डिसेंबर २०२३ रोजी ४.३० वाजता ठेवण्यात आली आहे.

गोरगरीब रुग्णांना वेळेवर दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळावे याकरिता वर्ष २०२१ पासून खासदार इम्तियाज जलील यांनी आरोग्य विभागाचा वैयक्तिकरित्या पाठपुरावा करून व्यक्तिश: उच्च न्यायालयासमोर युक्तिवाद करुन आपली बाजु मांडली. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रविंद्र घुगे व न्या.य.गो.खोब्रागडे यांच्या खंडपीठाने जनहित याचिकेतील नमुद मुद्यांवरती योग्य तो सकारात्मक प्रतिसाद देवून वेळोवेळी गोरगरीबांच्या रुग्णांच्या हितासाठी विविध आदेश आजपर्यंत पारीत करून शासनाकडून अनेक पदांची भरती व घाटी रुग्णालयाच्या सर्वांगिण विकासासाठी पूढाकार घेतल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!