अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या प्रश्नांवर बालविकास मंत्र्यांचे उत्तर असमाधानकारक ! विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग करून सत्ताधाऱ्यांना घाम फोडला !!
सर्वच प्रश्नांवर मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री बोलणार असतील तर तुमच्या उत्तराला काय अधिकार - अजित पवार
- राज्यातील अंगणवाडी सेविकांना १५ हजार रुपये मानधन आणि मदतनीसांना १० हजार रुपये मानधन देणार का? असा सवालही अजित पवार यांनी मंत्र्यांना केला.
मुंबई दि. ३ मार्च – विधीमंडळ सभागृहातील शंभर आमदार अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मानधन वाढवून देण्याबाबत प्रश्न विचारत आहेत इतका गंभीर प्रश्न असताना संबंधित बालविकासमंत्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सांगणार आहेत असे बोलत असतील तर या मंत्र्यांना इथे उत्तर देण्याचा काय अधिकार आहे असा थेट सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज, ३ मार्च रोजी केला.
अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधन वाढीचा प्रश्न सभागृहात आमदार पोटतिडकीने विचारात असताना बालविकास मंत्री समाधानकारक उत्तर देत नसल्याने विरोधी आमदार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
राज्यातील अंगणवाडी सेविकांना १५ हजार रुपये मानधन आणि मदतनीसांना १० हजार रुपये मानधन देणार का? असा सवालही अजित पवार यांनी मंत्र्यांना केला. दरम्यान अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या प्रश्नावर योग्य ते व समाधानकारक उत्तर बालविकास मंत्री लोढा यांनी न दिल्याने विरोधकांनी सभात्याग केला.
राज्यातील सुमारे दोन लाखापेक्षा जास्त अंगणवाडी कर्मचार्यांच्या मागण्याकडे केंद्र व राज्य सरकारचे सातत्याने दुर्लक्ष – गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील सुमारे दोन लाखापेक्षा जास्त अंगणवाडी कर्मचारी राज्यातील लाखो बालकांचे पोषण, शालेय पूर्व शिक्षण, गरोदर मातांची काळजी असे महत्त्वाचे कार्य करत आहेत .परंतु त्यांच्या मागण्याकडे केंद्र व राज्य सरकार सातत्याने दुर्लक्ष करीत आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोना काळात संपूर्ण विश्व घरात बंदिस्त असताना अंगणवाडी सेविकांनी मात्र घरोघरी जाऊन आरोग्य दूताचे काम केले. आपल्या जीवाची पर्वा न करता घरोघरी जाऊन त्यांनी जागृती आणि प्रबोधनाचे कार्य तितक्याच इमानेइतबारे पार पाडले. मात्र, राज्य आणि केंद्र सरकार अंगणवाडी सेविकांकडे दुर्लक्ष करत आहे.गेल्या २० फेब्रुवारीपासून संपाची हाक दिली होती.
दरम्यान मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनामुळे सरकारला घाम फुटला. कुंभकर्णी झोपेत असलेल्या राज्य सरकार खडबडून जागे झाले. या आंदोलनाच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या असून मानधनवाढीशिवाय आता माघार नाही, अशी भूमीका त्यांनी घेतली होती.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe