अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनसंदर्भातील शासन निर्णय जारी !
एकूण रुपये १३३२३.२४ लाख एवढा निधी वितरित करण्यास शासन मान्यता
- केंद्र शासनाकडून विहीत कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन अदा करणे शक्य व्हावे, याकरिता हा शासन निर्णय
मुंबई, दि. १० – अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरीत करण्यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. जानेवारीच्या मानधनासंदर्भातील हा शासन निर्णय फेब्रुवारीमध्ये जारी करण्यात आला. एकूण रुपये १३३२३.२४ लाख एवढा निधी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने काढलेल्या या शासन निर्णयात म्हटले आहे की, आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांच्या अधिनस्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते. केंद्र शासनाकडून विहीत कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन अदा करणे शक्य व्हावे, याकरिता अपर मुख्य सचिव (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २ जून २०१७ रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका, मदतनिस व मिनी अंगणवाडी सेविका यांचे माहे जानेवारी, २०२३ या महिन्याचे मानधन अदा करण्याकरिता एकूण रुपये १३३२३.२४ लाख एवढा निधी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
लेखाशिर्ष व बाब (रुपये लाखात)
२२२६- पोषण आहार ०२- पोषक अन्न व पेये यांचे वितरण १०१- विशेष पोषण आहार कार्यक्रम (०८) (०१) एकात्मिक बाल विकास सेवा योजना (सर्वसाधारण खर्च) केंद्र हिस्सा ६० टक्के (२२२६ १९०९) ०२- मजूरी – विद्यमान तरतूद २०२२-२३ – ४९९०२.७२ – यापूर्वीची वितरीत तरतूद – ४२२०९.७०, या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला निधी – ४२२०.९७
(०८) (०२) एकात्मिक बाल विकास सेवा योजना (सर्वसाधारण खर्च), राज्य हिस्सा ४० टक्के (२२३६ १९१८), विद्यमान तरतूद -३३२६८.२८, यापूर्वीची वितरीत तरतूद – २८१३९.८०, या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला निधी – २८१३.९८
(०८) (०५) अंगणवाडी सेवा, अतिरिक्त राज्य हिस्सा १०० टक्के (२२३६ १९४५), ०२ मजुरी, विद्यमान तरतूद – ७३८७६.०५, यापूर्वीची वितरीत तरतूद – ६२८८२.९०, या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला निधी – ६२८८.२९
एकूण – विद्यमान तरतूद – 157047.05, यापूर्वीची वितरीत तरतूद – 133232.40, या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला निधी – 13323.24
अंगणवाडीसंदर्भातील खालील बातम्याही वाचा-
आशा व अंगणवाडी सेविकांच्या मार्फत मोबाईलद्वारे गावोगावी ऑनलाईन कार्यक्रम राबवण्याचे निर्देश !
अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव नियोजन विभागाकडे पाठवला !
अंगणवाडी, ग्राम पंचायतीमध्ये ‘सुकन्या समृद्धी योजनेत’ खाते उघडण्यासाठी प्रबोधन !
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe