महाराष्ट्रराजकारण
Trending

शेतकऱ्यांना खतासाठी जात विचारणे ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक, जयंत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल !

मुंबई दि. १० मार्च – शेतकऱ्यांना खतासाठी जात विचारणे ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक असून याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला.

सांगली येथील खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात विचारली जात असल्याचा मुद्दा जयंत पाटील यांनी उपस्थित करुन शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

सरकार वर्णभेदासाठी किती आग्रही आहे हे सरकारच्या या भूमिकेतून दिसत आहे. सरकारने ही भूमिका रद्द केली पाहिजे. ही बाब जातीभेद वाढवणारी ठरू शकते अशी भीतीही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

Back to top button
error: Content is protected !!