महाराष्ट्र
Trending

शेतकऱ्यांना रासायनिक खते खरेदी करताना जात विचारली ! जातीवाद निर्माण करणार्‍या शिंदे फडणवीस सरकारला अजितदादांनी खडेबोल सुनावले !!

अहो, शेतकरी हीच आमची जात आहे... जात विचारून शेतकऱ्यांना खते काय देताय - अजित पवार

Story Highlights
  • अजित पवार जातीच्या राजकारणावरुन सभागृहात आक्रमक

मुंबई दि. १० मार्च – अहो शेतकरी हीच आमची जात आहे… खते खरेदी करताना शेतकऱ्याना जात कसली विचारताय असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला सभागृहात विचारला.

सांगली येथे रासायनिक खते खरेदी करताना जात विचारली जात असल्याचा मुद्दा अजित पवार यांनी उपस्थित केला व जातीवाद निर्माण करणार्‍या सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले.

रासायनिक खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात का सांगावी लागत आहे. ती का नोंदवावी लागते आहे असा सवालही अजित पवार यांनी केली.

ई पॉस सॉफ्टवेअर मशीनमध्ये जातीचा रखाना टाकण्यात आला आहे. त्यात शेतकऱ्यांना जात सांगावी लागते आहे. त्यामुळे जातीचे लेबल लावण्याचा प्रकार पुरोगामी महाराष्ट्रात घडता कामा नये असेही अजित पवार यांनी खडसावून सरकारला सांगितले.

या प्रकरणात कनिष्ठ अधिकारी बळीचे बकरे ठरु नये. कोण यामध्ये सहभागी आहे त्याच्यावर कारवाई करावी आणि जातीचे लेबल बंद करावे व याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणीही अजित पवार यांनी केली.

Back to top button
error: Content is protected !!