महाराष्ट्र
Trending

महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला जालना पोलिसांचा जोरदार “शॉक” ! बदली झाली म्हणून फटाक्याची आतषबाजी आणि डिजेच्या तालावर मिरवणूक काढणाऱ्या अभियंत्यासह ३० जणांवर गुन्हा !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २३- महावितरणच्या सहा अभियंत्याने बदली झाली म्हणून फटाक्याची आतषबाजी आणि डिजेच्या तालावर मिरवणूक काढल्याने जालन्यात ट्रॅफिक जॅम झाली. पोलिसांची कुठलीही परवानगी न घेता सार्वजनिक ठिकाणी जनतेला त्रास होईल असे वर्तन केल्याबद्दल सहाय्यक अभियंत्यासह ३० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अभियंत्याची जालना येथून रत्नागिरी येथे बदली झाली होती. आणि पुन्हा त्याच पदावर त्यांची जालना येथे बदली झाल्याने हा आनंदोत्सोव साजरा करण्यात आला. सहाय्यक अभियंता प्रकाश चव्हाण, महावितरण कार्यालय कन्हैया नगर, जालना असे गुन्हा दाखल झालेल्या अभियंत्याचे नाव आहे.

पोकॉ मधुर मच्छिद्रनाथ राजमाने ( पो.स्टे. सदर बाजार जालना) यांनी दिलेल्या प्राथम माहिती अहवालानुसार, दिनांक- 22.08.2023 रोजी पोलिसांना गोपनिय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, “जालना येथील तत्कालीन सहाय्यक अभियंता प्रकाश चव्हाण, महावितरण कार्यालय कन्हैया नगर, जालना यांची जालना येथून एक महिन्यापूर्वी रत्नागिरी येथे बदली झाली होती. मात्र अवघ्या महिनाभरात अभियंता प्रकाश चव्हाण यांची रत्नागिरी येथून पुन्हा जालना येथे त्याच पदावर बदली झालेली आहे.

त्यामुळे अभियंत्याच्या समर्थकांनी जालना शहरात जल्लोषात मिरवणुक काढून फटाक्याची आतषबाजी आणि डि.जे. च्या तालावर राजूर चौफुली ते महावितरणचे कार्यालय अशी दोन तास मिरवणुक चालली आहे.” ही माहिती पोलिसांना प्राप्त झाली. या माहितीवरून सदर ठिकाणी जाऊन मिरवणुक बाबत शहानिशा केली असता दिनांक 21.08.2023 रोजी 11.30 वा. ते 12.30 वा. सुमारास सहाय्यक अभियंता प्रकाश चव्हाण, महावितरण कार्यालय कन्हैया नगर, जालना यांची रत्नागिरी येथून जालना येथे त्याच पदावर बदली झाल्याने कन्हैया नगर चौफुली येथे सहाय्यक अभियंता प्रकाश चव्हाण, महावितरण कार्यालय कन्हैया नगर, जालना यांनी व 20 ते 30  लोकांनी डि.जे. लावून मिरवणुक काढली.

फटाक्याची आतषबाजी करून, सभा मंडप लावून कार्यक्रम आयोजित केलेला असल्याची शहनिशा पोलिसांनी केली. नंतर पोलिसांनी पोलीस स्टेशनला येऊन मिरवणुक व सभा कार्यक्रमाची परवानगी बाबत शहनिशा केली असता सदर मिरवणुकी व कार्यक्रमाबाबत आयोजकांनी पोलिस स्टेशनकडून कोणतीही कायदेशिर पूर्व परवानगी घेतलेली नसल्याचे समजले.

सहाय्यक अभियंता प्रकाश चव्हाण, महावितरण कार्यालय कन्हैया नगर, जालना यांची १ महिण्यापूर्वी जालना येथून रत्नागिरी येथे बदली झाली होती. आणि पुन्हा त्याच पदावर त्यांची जालना येथे बदली झाल्याने त्यांनी व इतर 20 ते 30 अनोळखी इसमांनी बदलीचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी कन्हैया नगर चौफुली दरम्यान कोणतीही कायदेशीर पूर्व परवानगी न घेता मिरवणुक काढुन, मिरवणुक मध्ये डि.जे. लावून, फाटक्याची आतषबाजी करून तसेच सभा मंडप लावुन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच येणा-या जाणा-या वाहनांना अडथळा निर्माण करुन जिल्हाधिकारी यांचे कलम 37 (1) (3) चे उल्लंघन केलेले आहे. म्हणून त्यांच्या विरुध्द एसबी जालना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Back to top button
error: Content is protected !!