महानगरपालिका
Trending

एन १२ हडको सिडको नर्सरी लगतच्या अतिक्रमणावर हतोडा, चंपाचौक ते कैसर कॉलनीपर्यंतचे ३० वर्षांपासूनचे अतिक्रमण हटवले !

हडको भागातील ड्रेनेज लाईनवरील अतिक्रमण काढल

संभाजीनगर लाईव्ह, दि. १८ – महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत सातत्याने शहरात विविध ठिकाणी अतिक्रमण कारवाई करण्यात येत आहे. आज अतिक्रमण विभागा मार्फत दोन पथकाद्वारे शहरातील ४ वेगवेगळ्या ठिकाणी अतिक्रमण कारवाई करण्यात आली.

चंपाचौक ते कैसर कॉलनी पर्यंत मागील ३० वर्षांपासून असलेले अतिक्रमण ठिकाणी एकूण ०९ मिळकती असून सदर जागेचा वापर दुकाने, हॉटेल व इतर व्यवसायासाठी करण्यात येत होता. आज सदर अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली व रस्ता मोकळा करण्यात आला. उद्या पुन्हा कैसर कॉलनी ते रेंगटीपुरा पर्यंत रस्ता बाधित अथवा अतिक्रमित मिळकती निष्कशीत करण्यात येणार आहे. या अनुषंगाने सदर मिळकती धारकांना (अतिक्रमित) सदरील अतिक्रमण स्वतःहून काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आज काढण्यात आलेले अतिक्रमण हे ३० मीटर रुंद रस्त्यात बाधित होते. आज करण्यात आलेल्या कारवाईमुळे नागरिकांना येणे जाणे साठी रस्ता मोकळा झाला आहे. तसेच रविंद्र नगर ते कटकट गेट येथील १८ मीटर रुंद रस्त्यावरील एकूण ३० मालमत्ता धारकांचे ओटे व पायऱ्या काढण्यात आल्या.

सदर कारवाई प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार व अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख रविंद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पद निर्देशित अधिकारी वसंत भोये, इमारत निरीक्षक मझहर अली, पंडित गवळी यांच्या पथकाने पार पाडली. तसेच
महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने एन १२ हडको सिडको नर्सरी लगत असलेले अतिक्रमणे आज हटवण्यात आले. याशिवाय हडको भागातील ड्रेनेज लाईन वरील एकूण सात लोकांचे अतिक्रमण काढण्यात आले.

आठ दिवसांपूर्वी हडको भागातील एन १२ येथील दुर्दैवी घटनेनंतर प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार कार्यकारी अभियंता विभाग यांनी त्वरित अतिक्रमण काढून देणे बाबत कळविले असता अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम यांनी आज सकाळी दहा वाजता स्थळ पाहणी करून सदरील अतिक्रमणे काढणे बाबत आदेशित केले.

त्या अनुषंगाने पद निर्देशित अधिकारी सविता सोनवणे यांनी पूर्ण पथकासह सदर अतिक्रमण काढण्यासाठी पोहचल्या. या भागातील अतिक्रमण धारकांनी जवळपास दहा ते बारा फूट उंचीचे भिंत कंपाउंड वॉल बांधल्याने जेसीबी त्या पर्यंत जाऊ शकला नाही त्यामुळे मजुरांच्या साह्याने सदरील अतिक्रमणे काढण्यात आले. यात दहा बाय पंधरा चा हॉल, टॉयलेट बाथरूम, दहा बाय दहा ची रूम लहान जीना व बाथरूम, अतिक्रमित लॉन व मोकळ्या जागेत करण्यात आलेले अतिक्रमण आणि लहान मोठे सर्व अतिक्रमण मजुरांच्या सहाय्याने काढण्यात आले.

सदर ठिकाणी दुर्दैवी घटल्यानंतर स्थानिक नागरिकांनी सुद्धा तक्रार दिली होती आणि तक्रारीचे गांभीर्य आणि सदर घटनेचे लक्ष ठेवून हे सर्व अतिक्रमणे काढण्यात आली आहे. आता वार्ड अभियंता झोन क्रमांक चार फारुख खान व सहकारी कर्मचारी हे ड्रेनेज लाईन चोकअप झालेली खुली करत आहेत.

सदर कारवाई प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख रवींद्र निकम यांचे मार्गदर्शनाखाली पदनिर्देशित अधिकारी सविता सोनवणे, वसंत भोये, वार्ड अभियंता फारुख खान कनिष्ठ कनिष्ठ अभियंता पायगन संदेश, इमारत निरीक्षक सय्यद जमशेद, रामेश्वर सुरासे व पथक मजूर यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Back to top button
error: Content is protected !!