देश\विदेश
Trending

मंत्री नितीन गडकरींना पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या, दिल्लीतील निवासस्थानी खणखणला फोन !

नवी दिल्ली, दि. १८ – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. नवी दिल्लीतील निवासस्थानी धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. धमकीचा फोन गडकरी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आल्यानंतर  कार्यालयातून ही माहिती दिल्ली पोलिसांना तातडीने देण्यात आली. ही माहिती मिळताच प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत दिल्ली पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे फिरवली आहेत.

प्राथमिक माहितीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याआधीही मंत्री नितीन गडकरी यांना दोनवेळी जीवे मारण्याच्या धमक्या आल्याची प्राथमिक माहिती आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत त्यांना नागपूर येथील कार्यालयातील लँडलाईन क्रमांकावर फोन करून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या.

मंत्री नितील गडकरी यांच्या दिल्लीतील निवासस्थानाशी संलग्न असलेल्या कर्मचाऱ्यांनी दिल्ली पोलिसांना धमकीचा फोन आल्याची प्राथमिक माहिती दिली. ही माहिती मिळताच पोलिसांनी याची तातडीने गंभीर दखल घेतली असून तपासाला वेग दिला आहे.

याआगोदर 14 जानेवारी रोजी केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचे फोन आले होते. त्यानंतर त्यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयाच्या लँडलाईन क्रमांकावर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. धमकी देताना त्याच्याकडून पैशांची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर २१ मार्च रोजी दुसरा धमकीचा कॉल आला. आता नितीन गडकरींच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी हा तिसरा फोन आल्याची प्राथमिक माहिती आहे.

Back to top button
error: Content is protected !!