महाराष्ट्र
Trending

महावितरणच्या तंत्रज्ञाची गचांडी पकडून श्रीमुखात भडकावली ! आकडा काढला म्हणून राग काढला, केज तालुक्यातील आडसमधील घटना !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १९- विद्युत तारेवरील आकडा काढला म्हणून महावितरणच्या कनिष्ठ तंत्रज्ञाची गचांडी पकडून गालात चापट मारल्याची घटना बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील आडस परिसरात घडली. युनिफॉर्म पाडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही महावितरणच्या कनिष्ठ तंत्रज्ञाने तक्रारीत म्हटले आहे.

माणिक साहेबराव वाघमारे (रा. एकता नगर आडस ता केज जि. बीड) असे आरोपीचे नाव आहे. सुदर्शन हनुमंत काळे (वय 36 वर्षे व्यवसाय नौकरी कनिष्ठ तंत्रज्ञ महावितरण रा. आडस ता. केज जि.बीड) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, ते मागील चार वर्षांपासून 33 के.व्ही उपकेंद्र आडस येथे कनिष्ठ तंत्रज्ञ म्हणून नौकरीस आहे. दि. 18/09/2023 रोजी सकाळी 08.00 वाजे पर्यंत महावितरणचे कनिष्ठ तंत्रज्ञ सुदर्शन काळे यांची नेहमीप्रमाणे आडस येथील 33 के. व्ही उपकेंद्र आडस येथे ड्यूटी चालु होती.

सायंकाळी 07.20 वाजता एकता नगर आडस येथून महावितरणचे कनिष्ठ तंत्रज्ञ सुदर्शन काळे यांना मोबाईलवर फ्युज तार कॉल आला असल्याने महावितरणचे कनिष्ठ तंत्रज्ञ सुदर्शन काळे यांनी वरिष्ठाना माहिती देवून फ्युज बसविणे कामी एकता नगर आडस येथे पोहोचले. तेथील विद्युत तारेवर डबल फेज अनाधिकृत अकडा माणिक साहेबराव वाघमारे यांनी आकडा टाकलेला दिसला.

यावर महावितरणचे कनिष्ठ तंत्रज्ञ सुदर्शन काळे यांनी माणिक साहेबराव वाघमारे यांना विनंती केली केली तुम्ही डबल फेजवर अनाधिकृत आकडा टाकला आहे. त्यामुळे फ्युज टिकत नाही व ट्रान्सफार्मर मध्ये बिघाड होत आहे. तो आकडा महावितरणचे कनिष्ठ तंत्रज्ञ सुदर्शन काळे हे काढत असताना वाघमारे यांनी शिवीगाळ करुन महावितरणचे कनिष्ठ तंत्रज्ञ सुदर्शन काळे यांच्या गच्चीला पकडले. युनिफॉर्मचा खिसा फाडला व गालामध्ये चापट मारली. तुला तर जिवेच मारतो अशी धमकी दिली.

तेवढ्यात एकता नगर मधील नागरीक आले व त्यांनी भांडणाची सोडवा सोडव केली. महावितरणचे कनिष्ठ तंत्रज्ञ सुदर्शन काळे यांनी घडलेली घटना वरीष्ठ अधिकारी पांडे, कनिष्ठ अभियंता यांना कळवली असता त्यांनी ऑफीसला बोलाविले व विचारपूस करुन सोबत पोलिस स्टेशनला धारुर येथे आले.

सुदर्शन हनुमंत काळे (वय 36 वर्षे व्यवसाय नौकरी कनिष्ठ तंत्रज्ञ महावितरण रा. आडस ता. केज जि.बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माणिक साहेबराव वाघमारे यांच्याविरोधात धारूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!