बीडच्या सह जिल्हा निबंधक कार्यालयातील लिपीक लाच घेताना चतुर्भुज ! गेवराईच्या कोर्टाने आदेश दिल्यानंतरही या महाशयाने पावती व हुकूमनामा प्रमाणित करून देण्यासाठी लाच घेतली !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १० – आईच्या नावावरील जमीन नावावर करून देण्याचा गेवराई कोर्टाने आदेश दिल्यानंतर त्यानुसार सह जिल्हा निबंधक कार्यालयात मुद्रांक शुल्क भरून पावती व हुकूमनामा प्रमाणित करून देण्यासाठी लाच घेताना लिपीकास रंगेहात पकडण्यात आले. शासकीय फी 600 रुपये व लाच रक्कम ९०० रुपये असे एकूण १५०० रुपये घेताना बीड सह जिल्हा निबंधक कार्यालयातील लिपीकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून पकडले.
आज, १० जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली. कार्यालयातच लाच घेतल्याने प्रशासकीय यंत्रणेला भ्रष्ट्राचाराची किती किड लागली आहे, हे यावरून स्पष्ट होते. विनोद गिरीधर मुनेश्वर (वय 32 वर्षे, कनिष्ठ लिपिक, सह जिल्हा निबंधक कार्यालय, बीड ता. जि. बीड) असे आरोपीचे नाव आहे. तक्रारदार यांच्या आईचे नावावरील जमीन तक्रारदार यांच्या नावावर करण्याबाबत गेवराई कोर्टाचे आदेश झाल्याने त्याकरिता सह जिल्हा निबंधक कार्यालयात मुद्रांक शुल्क भरून पावती व हुकूमनामा प्रमाणित करून देण्यासाठी आरोपी विनोद मुनेश्वर यांनी पंचासमक्ष एकूण 1500 रुपयांची मागणी करून जिल्हा सह निबंधक कार्यालयात पंचासमक्ष लाच रक्कम स्वीकारली. लाच स्वीकारताच पोलिसांनी झडप घालून त्यांना रंगेहात पकडले.
संदीप आटोळे पोलीस अधीक्षक, विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर, शंकर शिंदे, पोलीस उपअधीक्षक, ला. प्र. वि. बीड यांच्या मार्गदर्शनाखाली, सापळा अधिकारी – अमोल धस, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. बीड, सापळा पथक – पोलीस अंमलदार भरत गारदे, हनुमान गोरे, अविनाश गवळी, संतोष राठोड, चालक- गणेश म्हेत्रे यांनी पार पाडली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe