महाराष्ट्र
Trending

गेवराईच्या वीटभट्टीचालकाची ७० हजारांची ऑनलाईन फसवणूक ! ताकडगाव रोडवरील सैनिकी शाळेच्या बांधकामासाठी थाप मारून पैसे उकळले !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ९- मला गेवराई रोडवरील ताकडगाव रोडला सैनिक शाळेचे बांधकाम साठी विटा पाहिजे. विटाची गाडी येताच तुम्हाला ऑनलाईन पैसे पाठवतो म्हणून समोरच्याने विटभट्टी चालकाच्या मोबाईलवरील ओटीपी विचारून अनेकवेळा पैसे विड्रॉल केले. विटाच्या गाडीचे पैसे तर दिले नाहीच उलट विटभट्टी चालकाला बोलण्यात गुंतवून त्याच्याच मोबाईवरील ओटीपी विचारून तब्बल ७० हजारांची फसवणूक केली. मोबाईलच्या एकूण चार क्रमांकावरून त्याने ही फसवणूक केली.

सर्जेराव बन्सी मोटकर (विटभट्टी चालक, रा. गुळज ता. गेवराई जि. बीड) असे फसवणूक झालेल्या विटभट्टी चालकाचे नाव आहे. मागील 20 वर्षांपासून सर्जेराव बन्सी मोटकर हे वडीलोपार्जीत विटभट्टीचा व्यवसाय करतात. मोटकर यांना एका मोबाईलवरून कॉल आला आणि समोरचा म्हणाला की, मला गेवराई रोडवरील ताकडगाव रोडला सैनिक शाळेचे बांधकाम साठी विटा पाहिजे आहेत. मी तुम्हाला माझ्या सैनिकी शाळेचे लोकेशन तुमच्या मोबाईलवर पाठवतो तुम्ही त्या ठिकाणी विटा पाठवून द्या. गाडी पाठवली की मला फोन करून सांगा मी तुम्हाला विटाचे पैसे ऑनलाईन पाठवतो असे समोरचा मोटकर यांना म्हणाला.

त्यानंतर थोड्या वेळाने मोटकर यांनी विटाची गाडी पाठवली आहे. तुम्ही पैसे पाठवा असे त्याला सांगितले असता, त्याने मोटकर यांचा बँक खाते क्रमांक विचारला. मोटकर यांनीही बँक खाते क्रमांक सागितला. त्यानंतर त्याने कॉल करून सांगितले की, तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होत नाही तुम्ही तुमच्या ATM कार्डवरील नंबर सांगा. त्यानंतर मोटकर यांनी त्याला ATM कार्डवरील नंबर सांगितला असता त्यानी मोटकर यांच्याकडून बोलत बोलत otp क्रमांक विचारून मोटकर यांच्याच खात्यामधून 20000/- रुपये काढून घेतले.

त्यानंतर त्याने मोबाईलवरून 25000/- रुपयाची रिक्वेस्ट पाठवली. त्या रिक्वेस्टला क्लिक करून मोटकर यांच्या खात्यातून 25000/- रुपये टान्सफर झाले. त्यानंतर मोटकर यांनी त्यांना फोन करून सांगितले की, माझ्या खात्यातून पैसे कमी झाले आहेत. त्यानंतर त्यानी मोटकर यांना दोन वेगवेगळ्या क्रमांकाच्या मोबाईल वरून संपर्क साधून सांगितले की, तुमच्या खात्यामध्ये 25000/- परत जमा केले आहे. त्यानंतर त्यांनी सांगितले तुमची विटाची गाडी पोहचली आहे. तुम्हाला पैसे पाठवतो असे सांगून त्याने परत 25000/-रुपयांचा क्युआर रिक्वेस्ट कोड पाठवला.

त्यावर स्कॅन केले आणि OTP टाकून दिला. त्यानंतर परत त्यांनी 25000/- रुपयाचे क्युआर रिक्वेस्ट कोड पाठवला त्यावर स्कॅन केले आणि OTP टाकून दिला. थोड्या वेळानंतर मोटकर यांनी त्यांचे खाते चेक केले असता त्यांच्या बॅंक खात्यामधुन रक्कम कमी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर मोटकर यांनी सदरील मोबाईल क्रमांकावर कॉल केला असता त्याने मोबाईल बंद केला होता. त्यानंतर त्यास वारंवार फोन केला असता तो बंद होता. फसवणुक झाल्याचे मोटकर यांच्या लक्षात आले.

सर्जेराव बन्सी मोटकर (विटभट्टी चालक, रा. गुळज ता. गेवराई जि. बीड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून बीडच्या सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरु आहे.

Back to top button
error: Content is protected !!