छत्रपती संभाजीनगरमहाराष्ट्र
Trending

वनविभागाच्या परीक्षेत डमी परीक्षार्थी पकडला ! हर्सूल येथील युवकाच्या जाग्यावर बेंदेवाडीतील (दुधड) डमी परीक्षार्थीला सांगलीत पकडले !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ९- कॉपी व गैरप्रकारामुळे राज्यभर गाजत असलेल्या वनविभागाच्या परीक्षेत रोज नवनवीन गैरप्रकार समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगर येथे गुन्हा दाखल असतानाच आता पुन्हा सांगलीत गैरप्रकार उघडकीस आला आहे. हर्सूल येथील परीक्षार्थीच्या नावावर बेंदेवाडी (पो. दुधड)चा डमी युवक परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वीच पकडला गेला. वसंतदादा पाटील इंस्टिट्यूट मॅनेजमेंट स्टडी रिसर्च विजयनगर सांगली या कॉलेजच्या परीक्षा केंद्रा जवळील प्रवेश द्वाराजवळ त्यास संशय आल्याने पकडले. याप्रकरणी दोघां युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रदीप कल्यानसिंग बैनाडे (वय 26 वर्षे रा. बेंदेवाडी, पो. दुधड, तालुका व जिल्हा छत्रपती संभाजीनगर) हा राहूल सुखलाल राठोड (रा. हर्सूल छत्रपती संभाजीनगर) अशी आरोपींची नावे आहेत. प्रदीप कल्यानसिंग बैनाडे हा राहूल सुखलाल राठोड याच्या नावावर परीक्षा देण्या करीता परीक्षा गृहात जाण्यापूर्वी तो सहाय्यक वन संरक्षक विलास काळे व स्टाफच्या तपासणीमध्ये पकडला गेला.

विलास रंगनाथ काळे (वय 46 वर्षे, सहा वन संरक्षक, सामाजिक वनीकरण विभाग सांगली रा- वाखान रोड, कराड, ता- कराड, जि-सातारा) यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की,ते वन संरक्षक सामाजिक वनीकरण विभाग सांगली येथे कार्यरत आहे. मुख्य वन संरक्षक (प्रादेशिक) कोल्हापूर यांचेकडील पत्रा वन संरक्षक भरतीसंदर्भातील पत्रानुसार दि.08.08.2023 रोजी उमेदवारांच्या परीक्षे करीता वसंतराव दादा पाटील इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट स्टडी ॲन्ड रिसर्च सांगली येथे निरिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानुसार टीसीएस कंपनीकडून परीक्षा घेण्या करीता 6 लोक आलेले होते.

तसेच संरक्षण व तपासणी करीता एम.एस.एफ या सिक्युरिटी कंपनीचे तीन गार्ड होते. हे सर्व दिनांक 08/08/2023 रोजी दुपारी 03.00 वा ते 03.30 वाजेच्या दरम्यान ऑनलाईन परिक्षी देण्यासाठी आलेल्या उमेदवारांचे ओळखपत्र तपासणे, हॉल टिकीट तपासणे, इत्यादी कामे टी सी एस कंपनीचे कर्मचारी यांचे निगरानी खाली काम चालु होते. हॉल टिकीट व ओळखपत्र तपासूनच उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जात होता. सहाय्यक वन संरक्षक विलास काळे व अन्य स्टाफ तपासणी करीत असताना प्रदीप कल्यानसिंग बैनाडे (वय 26 वर्षे रा. बेंदेवाडी, पो. दुधड, तालुका व जिल्हा छत्रपती संभाजीनगर) हा राहूल सुखलाल राठोड (रा. हर्सूल छत्रपती संभाजीनगर) याच्या नंबरचे अॅडमिट कार्ड परीक्षा देण्या करीता परीक्षा गृहात जाण्यापूर्वी तो सहाय्यक वन संरक्षक विलास काळे व स्टाफच्या तपासणीमध्ये आढळून आला.

सदर प्रदीप कल्यानसिंग बैनाडे हा डमी उमेदवार असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यास परीक्षेस बसू दिले नाही. त्याने शासनाची फसवणूक केली असून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यानी या पूर्वी आशा प्रकारे डमी उमेदवार म्हणून परीक्षा दिली असल्याचे त्याने तोंडी सांगितले. त्यानंतर सहाय्यक वन संरक्षक विलास काळे यांनी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी त्याला ताब्यात घेवून त्याच्या ताब्यात मिळून आलेले राहुल सुखलाल राठोर याचे अॅडमिट कार्ड, राहुल राठोड याचे आधार कार्ड, तसेच त्याचे पॅन कार्ड या कागदपत्रांचा कॉलजे जवळच पंचनामा केला. जप्ती नामा दोन पंचां समक्ष करुन त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, व अँडमिट कार्ड असे कागदपत्र ताब्यात घेवून प्रदीप कल्यानसिंग बैनाडे (रा-बेंदेवाडी, पो. दुधड तालुका व जिल्हा छत्रपती संभाजीनगर) याला ताब्यात घेतले.

याप्रकरणी विलास रंगनाथ काळे (वय 46 वर्षे, सहा वन संरक्षक, सामाजिक वनीकरण विभाग सांगली रा- वाखान रोड, कराड, ता- कराड, जि-सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सांगली पोलिस स्टेशनमध्ये प्रदीप कल्यानसिंग बैनाडे (वय 26 वर्षे रा. बेंदेवाडी, पो. दुधड, तालुका व जिल्हा छत्रपती संभाजीनगर) हा राहूल सुखलाल राठोड (रा. हर्सूल छत्रपती संभाजीनगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!