छत्रपती संभाजीनगर
Trending

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या कर्जदारांचे कर्ज महाराष्ट्र ग्रामीण बँक टेकओव्हर करणार ! 108 कर्जदारांची निवड, मेळाव्याला 46 कर्जदारांचीच हजेरी, 62 कर्जदारांची दांडी !!

निकष पूर्ण करणार्या कर्जदारांचे कर्ज हस्तांतरीत झाल्यास ठेवीदारांना दिलासा मिळणार

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ५ – दोनशे कोटींच्या घोटाळ्यामुळे संपूर्ण राज्यात कुप्रसिद्धीस आलेल्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांचा पै न पै देण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. संस्थेच्या मालमत्ता सर्च करून ताब्यात घेण्याची व त्याचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरु असतानाच सायमलटेनीसली कर्जदारांकडून कर्ज वसुलीसाठीही प्रशासन प्रयत्नात आहे. यासंदर्भात पतसंस्थेतील कर्जदारांचा नुकताच मेळावा घेण्यात आला. आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील निकष पूर्ण करणार्या 108 कर्जदारांचे कर्ज टेकओव्हर करण्यास महाराष्ट्र ग्रामीण बँकेने पाऊल उचलले आहे. सदर कर्जदारांनी निकषांची पूर्तता करून त्यांचे कर्ज महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडे हस्तांतरित झाल्यास संस्थेची कर्जवसुली कमी कालावधीत होऊन ठेवीदारांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण होईल.

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे प्रशासकिय समिती अध्यक्ष तथा तथा, जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग -01 एस. पी. काकडे यांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजी नगर यांनी दिनांक 3.11.2023 रोजी संस्थेची प्रशासक समिती आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे चेअरमन व वरिष्ठ अधिकारी यांची बैठक घेऊन त्या बैठकीत महाराष्ट्र ग्रामीण बँकेने पतसंस्थेची काही कर्जे टेकओव्हर करावीत असे बँकेस सूचित केले.

त्यानुसार महाराष्ट्र ग्रामीण बँकेने कर्ज टेकओव्हर करण्यासाठी पतसंस्थेच्या 108 कर्जदारांची निवड केली. निवड झालेल्या त्या कर्जदारांचा दि. 05.11.2023 रोजी सकाळी 11 वाजता मुख्यालय, आदर्श नागरी सहकारी बँक लिमिटेड, कोकणवाडी, छत्रपती संभाजीनगर येथे कर्जदार मेळावा घेण्यात आला. सदर मेळाव्यास पतसंस्थेचे 46 कर्जदार उपस्थित होते.

मेळाव्यात कर्जदारांना त्यांचे कर्ज महाराष्ट्र ग्रामीण बँकेत वर्ग स्थलांतरित करण्याची पद्धत व फायदे समजावून सांगण्यात आले. इच्छुक कर्जदारांना आवश्यक कागदपत्रांसह महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या जवळच्या शाखेत संपर्क करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सदर कर्जदारांनी निकषांची पूर्तता करून त्यांचे कर्ज महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडे हस्तांतरित झाल्यास संस्थेची कर्जवसुली कमी कालावधीत होऊन ठेवीदारांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण होईल.

Back to top button
error: Content is protected !!