महाराष्ट्र
Trending

निकाला अगोदरच भाजप – शिंदे गटाच्या जास्त जागा जाहीर केले ते धादांत खोटे, महाविकास आघाडीकडे सर्वाधिक ३२५८ सरपंच आणि जागा: अजित पवार

नागपूर दि. २१ डिसेंबर – महाविकास आघाडीला ग्रामपंचायत निवडणुकीत ३२५८ सरपंच पदे तर महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळाल्याची माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.

भाजप आणि शिंदे गटाला ३०१३ सरपंच व इतर १३६१ आहेत. यामध्ये ७६१ हे महाविकास आघाडीशी संबंधित आहेत. महाविकास आघाडी आणि मित्र पक्षाचे ४०१९ सरपंच निवडून आले आहेत. अशापध्दतीने महाराष्ट्रात सर्वाधिक जागा महाविकास आघाडीच्या ग्रामपंचायतीत निवडून आल्या आहेत. त्याबद्दल सर्व ग्रामपंचायत सरपंच, सदस्यांचे अजित पवार यांनी अभिनंदन केले.

दरम्यान या ग्रामपंचायतींचे निकाल लागायच्याअगोदरच भाजप – शिंदे गटाच्या जास्त जागा आल्या असे जाहीर केले ते धादांत खोटे होते. ग्रामीण भागातील जनतेने महाविकास आघाडीच्या पाठी पाठबळ उभे केले आहे असेही अजित पवार यावेळी म्हणाले. .

दरम्यान या आनंदाच्या क्षणी महाविकास आघाडीच्या आमदारांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला.

Back to top button
error: Content is protected !!