छत्रपती संभाजीनगर
Trending

समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातानंतर छत्रपती संभाजीनगरचे पोलिस अलर्ट मोडवर ! ट्रॅव्हल्स बस असोसिएशन पदाधिकाऱ्यांना दिले हे निर्देश !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ५ – समृद्धी महामार्गावर बुलडाणा जिल्ह्यात खासगी बसला झालेल्या भीषण अपघातानंतर छत्रपती संभाजीनगर शहरातील पोलिस अलर्ट मोडवर येत ट्रव्हल्ससाठी मार्गदर्शक नियमावली तयार केली आहे. यासंदर्भात मीटिंग घेऊन त्यांना सूचना करण्यात आल्या असून त्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश पोलिसांनी दिले आहेत.

दिनांक ०४/०७/२०२३ रोजी सहाय्यक पोलीस आयुक्त, वाहतूक, छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यालयात शहरातील ट्रॅव्हल्स बस असोसिएशन यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये ट्रॅव्हल्स बस प्रवासादरम्यान व प्रवासाच्या सुरुवातीस प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घ्यावयाची खबरदारीबाबत चर्चा करण्यात आली. चर्चा दरम्यान अनेक मुद्यांवर सूचना व मार्गदर्शन करण्यात आले.

१) ट्रॅव्हल्स बस पार्किंग (दर्गा चौक, पंचवटी चौक, एस. के. पार्किंग बाफना मोटर्स जवळ) येथेच थांबली पाहिजे. सार्वजनिक रोडवर थांबणार नाही.
२) ट्रॅव्हल्स बस प्रवासासाठी निघण्यापुर्वी बस चालकाची पूर्ण झोप झाली अगर कसे? किंवा चालकाने कोणती नशा केली काय? यांची खात्री करावी.
३) ट्रॅव्हल्स बस बुकिंग करतांना सर्व प्रवाशीची सुंपुर्ण माहिती घ्यावी.

४) सर्व ट्रॅव्हल्स बसेसमध्ये सी. सी.टि.व्ही कॅमेरे बसवावे.
५) बस चालक यांनी वाहतूक नियमाचे काटेकोरपणे पालन करावे.
६) ट्रॅव्हल्स बस शहरात रात्री लवकर प्रवेश करणार नाहीत.
७) परराज्यात व राज्यात दूरच्या प्रवासादरम्यान बसमध्ये ०२ चालक राहतील.

८) कोणतीही ट्रॅव्हल्स बस भरधाव वेगाने न चालविता वेगमर्यादेत चालवावी.
९) शहारात कोठेही बस प्रवाशी चढ-उतार करणार नाहीत. शहरातील ट्रॅव्हल्स बस असोसिएशन पदाधिकाऱ्यांनी वरील सूचना व मार्गदर्शनाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर शहराचे वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त संपत शिंदे यांनी दिली.

Back to top button
error: Content is protected !!