छत्रपती संभाजीनगर
Trending

मलकापूर अर्बन बँकेच्या कर्मचाऱ्याचे घर फोडले ! पत्नी मंदिरात देव दर्शनास गेल्याची संधी साधून चोरट्याने भरदुपारी अवघ्या अर्ध्या तासात साफ केले घर !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २१ – मलकापूर अर्बन बँकेच्या कर्मचाऱ्याचे घर फोडून चोरट्यांनी रोख ५४ हजार व दागिने असा एकूण 1,21,000/- रुपयांचा ऐवज चोरून नेला. दुपाच्या वेळी फिर्यादी यांच्या पत्नी मंदिरात देव दर्शनास गेल्याची संधी साधून चोरट्याने अवघ्या अर्ध्या तासात घर साफ केले. चंद्रगुप्तनगरी रामतारा हौ. सो. शहानुरवाडी छत्रपती संभाजीनगर परिसरात ही घटना घडली.

विनायक पद्दामकर कुलकर्णी (वय 54 वर्षे, धंदा- नोकरी, रा. फ्लॅट नं. A1/19 चंद्रगुप्तनगरी रामतारा हौ. सो. शहानुरवाडी छत्रपती संभाजीनगर) यांनी जवाहरनगर पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, ते मलकापुर अर्बन बँक मध्ये नोकरी करतात. दिनांक 20/06/2022 रोजी सकाळी मुलगा शाळेत गेला विनायक कुलकर्णी हे बँकेत गेले.

नंतर दुपारी 01.00 वाजेच्या दरम्यान त्यांची पत्नी घराला कुलुप लावून मंदिरात गेल्या. दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास त्या मंदिरातून परत आल्या तेव्हा त्यांना घराची कडी कोडा तुटलेले दिसले. घरात प्रवेश करून पाहिले असता घरातील सामान अस्तव्यस्त पडलेले दिसून आले. त्या पत्नीने विनायक कुलकर्णी यांना फोन करून सदरची माहिती दिली. विनायक कुलकर्णी हे बँकेतून घरी आले व घरात पाहणी केली असता घरातील सामान अस्तव्यस्त पडलेले दिसले.

घरात असलेल्या लोखंडी कपाटाच्या आतील ड्राव्हरचे लॉक तोडलेले दिसले. कपाटात पाहणी केली असता त्यात ठेवलेले पत्नीचे सोन्याचे दागिने ज्यात मंगळसूत्र, अंगठी, साधे सोन्याचे मणी व एक तुकडा होता हे दागिने दिसून आले नाही. 54,000/- रुपये कॅश, व चांदीची पन्नास ग्रॅमची मोड चोरट्याने चोरून नेली. एकूण 1,21,000/- रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे विनायक कुलकर्णी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी जवाहर नगर पोलिस स्टेशनमध्ये चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!