पैठण ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील वाहतुक मार्गात बदल ! मंगळवारपासून या मार्गाचा करा अवलंब !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ७- छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण) हद्दीतील चितेगाव, गावातील व्हिडीओकॉन गेट नं १. जवळील पाण्याचे चेंबर ते जि.प.शाळा चित्तेगाव दरम्यान पाईपलाईनचे प्रस्तावित काम सुरू होणार आहे. त्यामुळे १०/१२/२०२४ ते दिनांक २६/०१/२०२५ पर्यंत पैठण ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील वाहतुकीत बदल करण्यात आला असल्याची माहिती शिलवंत नांदेडकर,पोलीस उप आयुक्त, मुख्यालय/ वाहतूक छत्रपती संभाजीनगर यांनी दिली.
छत्रपती संभाजीनगर शहर ते पैठणकडे जाणाऱ्या मुख्य रोडवर पोलीस अधिक्षक, कार्यालय, छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण) हद्दीतील चितेगाव, गावातील व्हिडीओकॉन गेट नं १. जवळील पाण्याचे चेंबर ते जि.प.शाळा चित्तेगाव दरम्यान ७२० मी.लाबीची व २५०० मी.मी. व्यासाची छत्रपती संभाजीनगर शहराकरीता पाणी पुरवठ्यासाठी लागणारी पाण्याच्या पाईप लाईनचे काम महाराष्ट्र जीवन प्राधीकरण तर्फे जी.व्ही.पी. आर. इंजीनियअर्स लि. या कंपनी मार्फतीने दिनांक १०/१२/२०२४ ते दिनांक २६/०१/२०२५ पर्यंत पैठण ते छत्रपती संभाजीनगर जाणाऱ्या पाईपलाईनचे प्रस्तावित काम सुरू होणार आहे. सदर काम हे हायकोर्टाच्या आदेशाने मर्यादित वेळेत पूर्ण करावे, असे आदेश संबंधितांना दिलेले आहेत.
छत्रपती संभाजीनगर ते पैठण रोड हा मुख्य रस्ता आहे. सदर रस्ता हा छत्रपती संभाजीनगर शहराला पैठणशी जोडणारा मुख्य रस्ता असून, वर्दळीचा आहे. या रोडवर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ निर्माण होऊन नागरिकांच्या सुरक्षिततेस, जीवितास धोका, अडथळा किंवा गैरसोय होऊ शकते. म्हणून परिसरातील रोडवर रहदारीच्या विनियमनासाठी व सुव्यवस्था राखण्यासाठी वाहतूक नियमन करणे आवश्यक आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर ते पैठणकडे जाणारे रोडवरील वाहतुक मार्गात खालीलप्रमाणे पोलीस अधिक्षक, छत्रपती संभाजीनगर, (ग्रामीण) कार्यालय यांचेकडून वाहतुक मार्गात बदल करण्यात आलेला आहे. त्याबाबत पोलीस अधिक्षक, छत्रपती संभाजीनगर, (ग्रामीण) इकडील कार्यालयास कळविले आहे. त्यानुसार पोलीस आयुक्तालय, छत्रपती संभाजीनगर तर्फे कार्यवाही करण्यात येणार आहे.
दिनांक १०/१२/२०२४ ते दिनांक २६/०१/२०२५ पर्यंत बदल करण्यात आलेला वाहतूक मार्ग खालील प्रमाणे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe