छत्रपती संभाजीनगर
Trending

आयोध्यानगरात आजारी पोलिस अंमलदाराला बेलन्याने मारले ! पत्नी आणि सासूने हात पकडले, जालन्याच्या मेव्हण्याची पोटात फाईटिंग !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १३ – पती-पत्नीच्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. ३ महिन्यांपूर्वीच पोटाचे ऑपरेशन झालेल्या आजारी पोलिस अंमलदाराचे पत्नी आणि सासूने हात पकडून मेव्हण्याने पोटात लाथाबुक्क्याने मारहाण केली. लाटणे (बेलने) हाताच्या पंज्यावर मारून जखमी केले. ही घटना सिडकोतील आयोध्यानगरात घडली.

याप्रकरणी रवि भगवान पवार (वय-33 वर्षे, व्यवसाय नोकरी पोलीस अंमलदार रा. संजयनगर, मुकुंदवाडी औरंगाबाद ह.मु. रुम नं. 11 अयोध्यानगर, औरंगाबाद) यांच्या तक्रारीवरून पत्नी, सासू व मेव्हणा सुरज संजय सोळंके यांच्यावर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी रवि पवार हे सशस्त्र पोलीस मुख्यालय क्रमांक-03 वरळी मुंबई शहर येथे नेमणुकीस आहेत. मागील 02 वर्षांपासून ते वैद्यकीय रजेवर आहेत. त्यांच्या आईची तब्येत ठिक नसल्याने तिला संभाळण्यासाठी ते आयोध्यानगर येथे किरायाने रुम करुन राहतात. 03 महिन्यांपूर्वी पोलिस अंमलदार रवि पवार यांच्या पोटाचे ऑपरेशन झालेले आहे.

दरम्यान, पोलिस अंमलदार रवि पवार यांचा व पत्नीचा कौटूंबिक न्यायालयात वाद चालु होता. कोर्टाने आदेशीत केल्याने पोलिस अंमलदार रवि पवार यांची पत्नी आयोध्यानगर येथे त्यांच्या घरी आली. दि.11/12/2022 रोजी सायंकाळी 04.00 वाजेच्या सुमारास पत्नीने वाद घातला व फोन करून तिच्या आईला बोलविले. सायंकाळी 06.00 वाजेच्या सुमारास तिची आई व भाऊ सुरज संजय सोळंके हे जालन्याहून पोलिस अंमलदार रवि पवार यांच्या घरी आले. आल्यावर त्यांनी शिवीगाळ सुरु केली.

त्यानंतर पत्नी आणि तिच्या आईने पोलिस अंमलदार रवि पवार यांचे हात पकडले. पत्नीचा भाऊ सुरज सोळंके यांने हाताचापटाने मारहाण करुन पोटात लाथाबुक्याने मारहाण केली. त्यानंतर त्याने घरात असलेले लाटने (बेलने) हातात घेवून पोलिस अंमलदार रवि पवार यांच्या उजव्या हाताच्या पंज्यावर मारून जखमी केले. तू नोकरी कशी करतो मी बघतो ? तुला जिवे मारुन टाकतो अशी धमकी देऊन तेथून निघून गेले. पत्नी आणि मुलीलाही घेऊन गेल्याचे पोलिस अंमलदार रवि पवार यांनी तक्रारीत म्हटले आहे.

रवि पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पत्नी, सासू व मेव्हणा सूरज सोळंके यांच्यावर सिडको पोलिस ठाण्यात 596/2022 कलम 325,324, 323,504, 506,34 भा.द.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सफौ काकडे करीत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!