छत्रपती संभाजीनगरात पोलिसांचे रात्रभर कोंबिंग ऑपरेशन ! हिस्ट्रीशीटर्स, गॅंगस्टर, गॅम्बलरची धरपकड, अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध 10 गुन्हे !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ९ – वाढती गुन्हेगारी व राज्यातील एकंदरीत परिस्थिती लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर शहर परिसरात पोलिसांनी कोंबिग ऑपरेशन राबवले. हिस्ट्रीशीटर्स, गॅंगस्टर, गॅम्बलरची (जुगारी) धरपकड करण्यात आली. रात्रीच्या वेळी राबवलेल्या या ऑपरेशनदरम्यान एकूण 23 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांनी दिली.
पोलिस आयुक्त मनोज लोहीया यांनी गुन्हेगारावर वचक राहून शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी दिनांक 08/06/2023 रोजी 23:00 ते दिनांक 09/06/2023 रोजी 02.00 वाजे पर्यंत पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्राअंतर्गत अचानक कोबींग ऑपरेशन राबवण्यात आले.
सदर कोबींग ऑपरेशनकरीता आयुक्तालयातील परिमंडळ – 1 व 2 चे पोलीस उप आयुक्त, सर्व सहायक पोलीस आयुक्त, सर्व 17 पोलीस ठाणे तसेच गुन्हे शाखा, विशेष शाखा, आर्थीक गुन्हे शाखा, सायबर पोलीस ठाणे, भरोसा सेल, सुरक्षा शाखा, अर्ज शाखा, दामीनी पथक अनैतीक मानवी व्यापार प्रतिबंधक विभाग येथील सर्व प्रभारी अधिकारी व पोलीस ठाणे तसेच शाखेला नेमणुकीस असलेले अमंलदार अशा जास्तीत जास्त मनुष्यबळाचा वापर करून सदरचे कोबींग ऑपरेशन शहरात प्रभावीपणे व नियोजनबध्दरित्या राबविण्याकरीता पोलिस आयुक्त मनोज लोहीया यांनी मार्गदर्शन करून आदेशीत केले होते.
पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील एकूण 75 पोलीस अधिकारी व 391 पोलीस अमंलदार असे एकूण 466 अधिकारी व अमंलदार यांना सदर कोबींग ऑपरेशनकरीता नेमण्यात आले होते. कोबिंग ऑपरेशन दरम्यान 1) अवैध मद्यविक्री करणारे आरोपी एकुण 26 गुन्हे दाखल केले, 2) अवैध जुगार खेळणारे यांचे विरुध्द एकूण 03 गुन्हे दाखल केले, 3) अवैध शस्त्रे बाळगणारे यांचे विरुध्द एकूण 10 गुन्हे दाखल केले,
4) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 प्रमाणे 06 गुन्हे दाखल केले, 5) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे शहरातून तडीपार असलेले दोन जणांवर 02 गुन्हे दाखल केले, 6) एकूण 23 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तसेच मोटार वाहन कायद्या अंतर्गत एकूण 122 कैसेस करून 1,11,400 /- रु. चा दंड वसुल करण्यात आला आहे.
सदर कोबींग ऑपरेशन हे शहरातील रात्रीच्या वेळेस उशीरापर्यंत चालु असलेले आस्थापना, वाढती गुन्हेगारी, निर्जनस्थळी होणारे शरीर व मालाविरुध्दचे गंभीर गुन्हे यांना वेळीच प्रतिबंध करणे, तसेच शहरातील अवैध धंदे यांचे समुळन उच्चाटन करण्यासाठी पोलीस ठाणे अभिलेखावरील गुन्हेगार, हिस्ट्रीशीटर्स, गॅग हिस्ट्रीशिटर्स, गुन्ह्यात पाहीजे व फरार असलेले आरोपी, NBW वारन्ट मधील आरोपी यांची अचानकपणे धरपकड करून गुन्हेगारी व समाजकंटकावर वेळीच आळा घालून शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखणे राबविणे हा कोबींग ऑपरेशन राबविणे मागील मुळ उद्देश होता. याकरीता पोलीस आयुक्त यांनी आयुक्तलय कार्यक्षेत्रात रात्रीच्यावेळी अचानकपणे कोबींग ऑपरेशन राबवले.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe