राजकारण
Trending

शरद पवारांना धमकी देणाऱ्या पिंपळकरांचे भाजप नेत्यांसोबतचे फोटो ट्विट करून अमोल मिटकरींचा आरोप, करारा जवाब मिलेगाचा दिला इशारा !

मुंबई, दि. ९ – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सोशल मीडियावरून धमकी देणाऱ्या पिंपळकरांचे भाजप नेत्यासोबतचे फोटो ट्विट करून हे रक्त कुणाचं? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आ. अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार’ अशी धमकी सोशल मीडियावर विशेषतः फेसबुकवर देण्यात आली आहे. ही गंभीर बाब लक्षात आल्यावर आज खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.

दरम्यान, अमरावती येथील सौरभ पिंपळकर नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो भाजप कार्यकर्ता असल्याचा उल्लेख ट्विटरवर करण्यात आला असल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अमोल मिटकरी यांनी केला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सोशल मीडियावरून धमकी देणाऱ्या पिंपळकरांचे भाजप नेत्यासोबतचे फोटो ट्विट करून हे रक्त कुणाचं? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अमोल मिटकरी यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना केला आहे. पिंपळकर सोबत असलेले या बावन्नकुळे आणि दानवे यांचे फोटो मिटकरी यांनी ट्विट केले आहे.

हे आमच्या रक्तात नाही म्हणणारे बावनकुळेजी हे रक्त नेमकं कुणाचं आहे? पवार साहेबांना धमकी देणारा पिंपळकर तुमच्या बाजूला केक कापतोय, ‘राजकारण महाराष्ट्राचे’ ‘नर्मदाबाई पटवर्धन’ सौरभ पिंपळकर हे ट्विटर अकाउंट कुणाच्या रक्ताचे? असा सवाल उपस्थित करून करारा जवाब मिलेगा असा इशाराही मिटकरी यांनी दिला आहे.

 

Back to top button
error: Content is protected !!