छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत ! फारोळा पंपगृहातील Manifold Pipe तुटले, दुरुस्तीस १० तास लागणार !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. २७ – छत्रपती संभाजीनगर शहरास पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या फारोळा पंपगृहात तांत्रीक बिघाड झाल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. हा बिघाड दुरुस्त होण्यास ८ ते १० तासांचा अवधी लागण्याची शक्यता महानगरपालिकेने व्यक्त केली आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरास पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या १०० दलली योजनेवरील नवीन फारोळा पंपगृह येथे दि. २७/०५/२०२३ रोजी सकाळी ०८:४० वाजता पंप क्र. ०४ (६७० अ.श.) येथील Manifold Pipe तुटल्यामुळे पंपगृहामधील मेन पॅनल, मोटर, स्टार्टर, एल. टी. कॅपॅसिटर पॅनल यामध्ये पाणी शिरले. यामुळे तात्काळ पंपिंग बंद करून घेतली.
त्यानंतर युद्धपातळीवर पाइपचे वेल्डिंगसह पूर्ण पॅनल चेकींग, क्लिनींग, हीटर्स लाऊन पॅनल हिटींग, मोटर मेगरींग इ. कामे करण्याचे काम चालु आहे. सदरील दुरुस्तीचे कामे पूर्ण होण्यास जवळपास ८ ते १० तासांचा कालावधी लागणार आहे. परिणामी या काळात १०० दलली योजनेवरील पाणी उचल पूर्णतः बंद राहणार आहे.
या सर्व कारणामुळे शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे. नागरिकांनी या काळात होणाऱ्या गैरसोईबाबत परिस्थिती पाहता महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe