संभाजीनगर लाईव्ह, दि. १७- जबरी चोरी करणारा सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आला. सिल्लोड व गंगापूर येथून त्याने चोरी केल्याची कबुली दिली आहे. याशिवाय चोरीचा माल त्याने बायजीपुरा येथील सोनारास विक्री केल्याचे सांगितल्यावरून त्या सोनाराकडून चोरीचे सोने पोलिसांनी जप्त केले आहे. हर्सूल टी पॉईंटवर आरोपीला सापळा लावून अटक करण्यात आली. सोनाराकडून दोन सोन्याच्या लगड (किंमत 80,445/- रु) पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
उस्मान मोहम्मद शेख (वय 34 वर्षे रा- शरीफ कॉलनी गल्ली नं 9 रोशन गेट छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. गंगापूर पोलिस स्टेशन 41/2023 कलम 392 भादवि (दिनांक 04/02/2023 रोजी) व सिल्लोड शहर पोलिस स्टेशन 98/2023 कलम 392 भादवि (दिनांक 10/05/2023 रोजी) हे दोन गुन्हे त्याने केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस ठाणे सिल्लोड शहर येथे फिर्यादी वैशाली दिलीप सरोदे (रा. जैनोद्दीन कॉलनी सिल्लोड) यांनी पोलीस ठाणे सिल्लोड शहर येथे दिनांक 10/05/23 रोजी फिर्याद दिल्या वरून गुरनं 98/2023 कलम 392 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल झाला. सदर गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करत असताना पोलीस निरीक्षक सतिश वाघ यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, सदर गुन्हा हा आरोपी उस्मान मोहम्मद शेख (वय 34 वर्षे रा- शरीफ कॉलनी गल्ली नं 9 रोशन गेट छत्रपती संभाजीनगर) याने केलेला असल्याची माहिती मिळाली.
या माहितीनंतर तात्काळ एक पथक तयार केले. पोउपनि मोरे यांना गुप्त बातमीदार यांच्या मार्फत खात्रीलायक माहिती मिळाली की, सदरचा आरोपी हा हर्सूल टी पाईंट येथे येत आहे. ही माहिती मिळाल्याने सदर पथकाने हर्सूल टी पाईंट येथे सापळा रचून आरोपी सदर ठिकाणी येताच त्यास ताब्यात घेतले. गुन्हयाच्या अनुशंगाने विचारपुस केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली. तसेच त्याने गंगापुर पोलिस स्टेशन येथील गुरनं 41 / 2023 कलम 392 भादवि गुन्हा केल्या बाबतची कबुली दिलेली असून त्याने सदर दोन्ही गुन्हयातील सोन्याचे दागिने हे बायजीपुरा येथील सोनारास विक्री केल्याचे सांगितले.
सदर सोनाराकडे जाऊन चौकशी केली असता त्याने दोन्ही गुन्हयातील चोरी गेलेले सोन्याचे दागिने विकत घेतल्याची कबुली दिली. सदर सोनाराकडून दोन सोन्याच्या लगड किंमती 80,445/- रु पंचासमक्ष जप्ती पंचनामा करून तपास कामी जप्त करण्यात आलेल्या आहे. सदर आरोपीस पुढील तपास कामी सिल्लोड शहर पोलिस स्टेशन येथे हजर करण्यात आलेले आहे.
ही कामगीरी पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ, पो.उप.नि. मधुकर मोरे, सफौ वाघ, पोह लहु थोटे, पोह संतोष पाटील, पोह कासीम शेख, पोह श्रीमंत भालेराव, पोह संजय घुगे, पोअं आनंद घाटेश्वर, पोअं राहुल गायकवाड यांनी पार पाडली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe