छत्रपती संभाजीनगर
Trending

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या गावांत उडणार निवडणुकीचा धुरळा ! ग्रामपंचायतसाठी नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी वेळ वाढवली !!

ग्रामपंचायत निवडणूक २०२३ 

संभाजीनगर लाईव्ह, दि.१८ :- राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यात दि.१६ ते दि.२० दरम्यान नामनिर्देशन पत्र सादर केले जात आहेत. ही प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे पार पाडली जात आहे. तथापि, नामनिर्देशन पत्रासोबत सादर करावयाचे घोषणापत्र भरतांना तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी आयोगाकडे प्राप्त होत आहेत. ही तांत्रिक अडचण महाऑनलाईन कडून दूर करण्यात आली आहे. तथापि, दि.१८ ते दि.२० या कालावधीत नामनिर्देशन पत्र भरण्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी तीन ऐवजी सायंकाळी साडेपाच पर्यंत वाढविण्यात आली आहे, असे राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या वेळापत्रकानुसार दि.२० पर्यंत नामनिर्देशन पत्र सादर करता येणार आहेत. दि.२३ रोजी सकाळी ११ वा. नामनिर्देशन पत्रांची छाननी केली जाईल. दि.२५ रोजी नामनिर्देशन मागे घेण्याचा दिनांक (दुपारी तीन वाजेपर्यंत), दुपारी तीन वाजेनंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा व अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल,आवश्यक असल्यास दि.५ नोव्हेंबर रोजी मतदान होईल.

मतदानाची वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वा. पर्यंत), मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक सोमवार दि.६ नोव्हेंबर. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूक निकालाची अधिसुचना गुरुवार दि.९ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. जिल्ह्यात खालील ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर तालुक्यात अंजनडोह, गोलवाडी, पैठण तालुक्यात वडवाळी, सोयगाव तालुक्यात माळेगाव पिंप्री, कन्नड तालुक्यात गुदमा, खुलताबाद तालुक्यात घोडेगाव, रसुलपुरा, तिसगाव, तिसगाव तांडा, वैजापूर तालुक्यात भिंगी, पानगव्हाण, अगरसायगाव, गंगापूर तालुक्यात शहापुर बंजर, वजनापूर, आंबेगाव, गुरुधानोरा.

तर खालील ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूका होणार आहेत. छत्रपती संभाजीनगर तालुक्यात टोणगाव, माळीवाडा, आपतगाव, फुलंब्री तालुक्यात जळगाव मेटे, सिल्लोड तालुक्यात आसडी, वरखेडी/भायगाव. रेलगाव, अजिंठा, सोयगाव तालुक्यात कवली, डाभा, गलवाडा, कन्नड तालुक्यात मकरणपूर, देवपूडी, कोळंबी मा., बिबखेडा. खुलताबाद तालुक्यात कनकशिळ, मावसाळा, गंगापूर तालुक्यात वडगाव टोकी, वरझडी, नवाबपूर, कासोडा, इटावा, वैजापूर बाभूळतेल, सावखेड (खं.) पैठण तालुक्यात पारुंडी, आडुळ बु., पाचोड बु., नायगाव येथे पोटनिवडणुका होणार आहेत.

Back to top button
error: Content is protected !!