छत्रपती संभाजीनगर
Trending

हर्सूल जेलमध्ये झडतीची टीप दिल्यावरून कैद्यांचा राडा, मी कोल्हापूर जेलमध्ये मर्डर करून आलेलो आहे ! तुरुंग अधिकाऱ्याचीही कॉलर पकडली, शिपायाच्या कानशिळात लगावली !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २९- एका कैद्याने झडतीची टिप दिल्यावरून दुसऱ्या कैद्याने त्याच्यावर हल्ला चढवला. दरम्यान, यात दोन गट पडून टोळी युद्ध भडकले. एवढेच नाही तर तुरुंग अधिकारी व स्टाफवरही कैद्यांनी हल्ला चढवून हर्सूल जेलमध्ये राडा घातला. मी कोल्हापूर जेलमध्ये मर्डर करून आलेलो आहे तुझाही मर्डर करून टाकीन अशी धमकी एका कैद्याने दिल्याने एकच राडा झाला. दरम्यान ९ कैद्यांनी हा गोंधळ घातला. तरुंग अधिकाऱ्याशीही यांनी झटापट केली. त्यांना धमकावले, शिपायाच्या कानशिळात लगावली कॉलर पकडून जेल गरम करण्याची धमकी दिली. सकाळी ७.४५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

1. शाहरुख अकबर शेख, वय 30 वर्षे, 2. सतिश काळुराम खंदारे, वय 30 वर्षे, 3. गजेंद्र ऊर्फ दादा तुळशीराम मोरे, वय- 42वर्षे, 4 निखील भाऊसाहेब गरड, वय- 25वर्षे, 5. किरण सुनिल साळवे, वय 22 वर्षे, 6. ऋषीकेश रविंद्र तनुपरे, वय 25 वर्षे, 7. अनिल शिवाजी गडवे, वय- 25वर्षे, 8. अनिकेत महेंद्र दाभाडे, वय-22वर्षे, 9. राज नामदेव जाधव वय – 26 वर्षे अशी राडा करणाऱ्या कैद्यांची नावे आहेत.

तुरुंग अधिकारी प्रविण रामचंद्र मोडकर (मध्यवर्ती कारागृह, हर्सूल छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दि.27/08/2023 रोजी सकाळी तुरुंग अधिकारी प्रविण मोडकर यांची ड्युटी सकाळी 05.00 वाजता विशेष झडती पथक म्हणुन होती. सोबत दोन अधिकारी अमित गुरव (तुरुंग अधिकारी ), ज्ञानेश्वर चव्हाण तसेच कर्मचारी अशोक रावते, योगेश चिंतामणी, रामेशवर पालवे, गणेश कामठे, सुनिल सानप, विजय नैमाने, सुमंत मोराळे हे विशेष झडती पथकात होते. दरम्यान  झडती पथकाचे कार्य असे की, कारागृहातील बंद्या (कैदी) जवळ काही अवैध वस्तु शोधणे, संशस्यपाद हालचालीवर लक्ष ठेवणे असे आहे.

दरम्यान कारागृहात ओपनीग वेळी जनरल झडती सुरू असताना सकाळी 07.45 वाजेच्या सुमारास नवीन सर्कल मुख्य प्रवेशद्वार येथील परिसरामध्ये बॅरेक क्र.5 येथील एका शिक्षाधीन बंदी याने समक्ष येवून उपस्थित अंतर्गत सुरक्षा प्रमुख अधिकारी सतिष हिरेकर यांना सांगितले की, “साहेब मला बॅरेक क्र.5 येथील न्यायाधीन बंदी शाहरुख अकबर शेख हा झडतीची टिप देण्याच्या कारणावरून मला मारहाण करीत आहे. अंगावर धावून येऊन, जोर-जोराने ओरड होता की मी कोल्हापूर जेलमध्ये मर्डर करून आलेलो आहे तुझाही मर्डर करून टाकीन अशी धमकी देत आहे असे सांगत होता.

त्यानंतर सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अंतर्गत सुरक्षा प्रमुख अधिकारी सतिष हिरेकर यांनी सदर बंदी शाहरूख अकबर शेख यास चौकशीकरीता बोलावून घडलेल्या घटनेबाबत विचारणा करीत असतांना सदर बंदी शाहरूख अकबर शेख हा जोरजोरात आरडाओरडा करून आमच्या समक्ष एका शिक्षाबंदीस मारहाण करू लागला. त्यावेळी सदर शिक्षाबंदी बद्रीनाथ काशीनाथ शिंदे याने देखील न्यायाधीन बंदी शाहरुख अकबर शेख याच्यावर प्रतिकार करुन चेहऱ्यावर व इतर ठिकाणी हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्यावेळी सदर घटनेच्या ठिकाणी उपस्थित कर्तव्यावरील अधिकारी / कर्मचारी यांनी तात्काळ हस्तक्षेप करून बंद्यांचे भांडण मिटविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी न्यायाधीन बंदी शाहरुख अकबर शेख याने तुरुंग अधिकारी प्रविण मोडकर यांच्या गळ्याला पकडून पायात पाय घालून खाली पाडले व लाथाबुक्याने मारहाण करायला सुरुवात केली. ते पाहुन ‘बॅरेक क्र. 1 येथील बंद्यांनी आरड ओरडा करीत बॅरेकचा दरवाजा हाताने जोरात ढकलून काही बंदी बॅरेकच्या बाहेर आले.

न्यायाधीन बंदी सतिश काळूराम खंदारे याने अचानकपणे पळत येवून कर्तव्यावरील कारागृह शिपाई सुमंत सुर्यभान मोराळे यांच्या पाठीमागून येवून कानशिळीत मारली. त्यावेळी तुरुंग अधिकारी प्रविण मोडकर यांच्या सोबतचे मंडल तुरुंगाधिकारी अमित गुरव यांनी या घटनेस अटाकाव / मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, न्यायाधीन बंदी सतिश काळुराम खंदारे याने अंगावर धावून हाता चापटाने मारहाण करत झटापट करु लागला. त्यावेळी उपस्थित इतर अधिकारी व कर्मचारी राडा करणार्या बंद्यांना अडवित असताना न्यायाधीन बंदी गजेंद्र तुळशीराम मोरे याने देखील सदर भांडणामध्ये येवून इतर बंद्यांना अधिकारी कर्मचारी यांच्यावर हल्ला करण्याप्रकरणी चिथावणी देवून भडकावले.

त्यामुळे बॅरेक क्र. १ मधील न्यायाधीन बंदी निखील भाऊसाहेब गरड, न्यायाधीन बंदी किरण सुनिल साळवे, न्यायाधीन बंदी रूषीकेश रविंद्र तनपुरे हे तुरुंग अधिकारी प्रविण मोडकर व अन्य स्टाफच्या जवळ येवून कर्तव्यावरील तुरुंगाधिकारी यांच्या अंगावर धावून जोर जोराने आवाज करू लागले. अधिकारी/कर्मचारी यांच्याशी झटापट करु लागले. सर्व बंद्यांनी मिळून घटनास्थळावरील अधिकारी कर्मचारी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच आम्हा अधिकारी / कर्मचारी यांना शिवीगाळ करुन जेलमध्ये जिवे मारण्याचे धमक्या देत होते.

सदरची घटना बघुन जवळचे सर्कल इतर बॅरैक क्र.5 येथील आनंद सुरेश लोखंडे, न्यायालयीन बंदी अनिकेत महेंद्र दाभाडे, बॅरेक क्र. 16 येथील राज नामदेव जाधव या बंद्यांनी आरडा ओरडा करीत आमच्या शाहरूख भाई व मोरे दादाला काही केले तर तुमच्या सर्वाला मारून टाकू. जेल गरम करून टाकू अशी धमकी देत बॅरेकचा दरवाजा जोर-जोरात ओढून तोडण्याचा प्रयत्न केला. कारागृहीन शांततेचा भंग करून शिस्त व नियम यांचे उल्लंघन केले. सदर भांडणामध्ये न्यायाधीन बंदी शाहरूख अकबर शेख याच्या उजव्या डोळ्यास किरकोळ दुखापत झालेली आहे. सदर घटनच्या वेळी कर्तव्यावरील कर्मचारी यांनी धोक्याची शिट्टी वाजवन वातावरण शांत करण्यासाठी इतर अधिकारी / कर्मचारी यांना प्राचरण केले व थोडयाच वेळात इतर सर्कलमधील अधिकारी / कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल झाल्यावर वातावरण शांत केले.

याप्रकरणी तुरुंग अधिकारी प्रविण रामचंद्र मोडकर (मध्यवर्ती कारागृह, हर्सूल छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 1. शाहरुख अकबर शेख, वय 30 वर्षे, 2. सतिश काळुराम खंदारे, वय 30 वर्षे, 3. गजेंद्र ऊर्फ दादा तुळशीराम मोरे, वय- 42वर्षे, 4 निखील भाऊसाहेब गरड, वय- 25वर्षे, 5. किरण सुनिल साळवे, वय 22 वर्षे, 6. ऋषीकेश रविंद्र तनुपरे, वय 25 वर्षे, 7. अनिल शिवाजी गडवे, वय- 25वर्षे, 8. अनिकेत महेंद्र दाभाडे, वय-22वर्षे, 9. राज नामदेव जाधव वय – 26 वर्षे यांच्यावर हर्सूल पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!