छत्रपती संभाजीनगर
Trending

हर्सूल टी पॉईंटजवळ नंददीप फ्लोटींग स्पिरीट हॉटेल समोर खून, मुकुंदवाडीचे दोन आरोपी जेरबंद !

संभाजीनगर लाईव्ह, दि. ९- हर्सूल टी पॉईंटजवळील नंददिप फ्लोटींग स्पिरीट हॉटेलच्या समोरील पार्कींगच्या कोपर्यामध्ये झालेल्या खून प्रकरणात दोन आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. हर्सूल पोलिसांनी या दोघांना अटक केली.

निलेश महेंद्र साळवे (वय २९ वर्षे व्यवसाय मजुरी रा. संकट मोचन शिवमंदिर जवळ जुनी मुकुंदवाडी छत्रपती संभाजीनगर), शेखर उर्फ निखील फकिरचंद जोंधळे (वय २६ वर्षे व्यवसाय खा. नो. रा. हनुमान मंदिरा समोर पोलीस कॉलनी मुकुंदवाडी छत्रपती संभाजीनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सुरेश हरीभाऊ जावळे (वय ४० वर्षे रा. देहाडेनगर अंबरहिल जटवाडा रोड छत्रपती संभाजीनगर) यांचा काही दिवसांपूर्वी खून झाल्याची तक्रार नातेवाईकाने पोलिसांत दाखल केली होती.

दिनांक ०४ / १० / २०२३ रोजी रात्री ०९.०० वाजेच्या सुमारास हर्सूल पोलीस स्टेशनच्या हद्दीत नंददिप फ्लोटींग स्पिरीट हॉटेलच्या समोरील पाकींगच्या कोप-या मध्ये सुरेश हरीभाऊ जावळे (वय ४० वर्षे रा. देहाडेनगर अंबरहिल जटवाडा रोड छत्रपती संभाजीनगर) यांचा कोणीतरी अज्ञात कारणासाठी धारदार हत्याराने मारून गंभीर जखमी करून खून केला होता. घटनेबाबत मृताच्या नातेवाईकाने पो. स्टे. हर्सूल येथे तक्रार दिल्यावरून कलम ३०२ भा.द.वि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाच्या तपासामध्ये पो.स्टे. हर्सूल येथील पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी पो. स्टे. चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार केली.

घटनास्थळावरिल व आसपास असणारे CCTV फुटेजची तसेच CCC सेफ सिटी प्रोजक्टच्या कॅमे-याचे तांत्रीक मदतीने व गोपनीय बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, सदर गुन्हयातील दोन आरोपी हे मोटार सायकलच्या मदतीने मुकुंदवाडी भागात गेले असल्याचे समजले. हर्सूल पो. स्टे. चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मुकुंदवाडी भागात सदर आरोपीतांचा शोध घेतला असता आरोपी निलेश महेंद्र साळवे (वय २९ वर्षे व्यवसाय मजुरी रा. संकट मोचन शिवमंदिर जवळ जुनी मुकुंदवाडी छत्रपती संभाजीनगर), शेखर उर्फ निखील फकिरचंद जोंधळे (वय २६ वर्षे व्यवसाय खा. नो. रा. हनुमान मंदिरा समोर पोलीस कॉलनी मुकुंदवाडी छत्रपती संभाजीनगर) हे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले. पो. स्टे. हर्सूल येथे आणून खात्री करुन त्यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कामगीरी पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०२ शिलवंत नांदेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त सिडको विभाग साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली हर्सूल पो. स्टे. चे पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार, पोलीस उप निरीक्षक एम. एच. खिल्लारे, पोलीस उप निरीक्षक सुनील चव्हाण, पोलीस उप निरीक्षक रफी शेख, पोलीस उप निरीक्षक शेकनाथ अधाने, श्रेणी पोउपनि राजु मोरे, पोह/ विठ्ठल डकले, पोलीस नाईक दहिफळे पो.ना. शिवाजी शिंदे, पोअं/ अनिल पालवे चापोअं नितीन तुपे यांनी पार पाडली. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार करीत आहे.

Back to top button
error: Content is protected !!