डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अधिसभेची बैठक १२ मार्च रोजी ! निवडणूक, अर्थसंकल्प मांडणार, सदस्यांची निवड होणार !!

छत्रपती संभाजीनगर, दि.०४ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक येत्या १२ मार्च रोजी होणार असून या बैठकीत व्यवस्थापन परिषदेसाठीची निवडणूक, वार्षिक अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी तथा कलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी दिली. दरम्यान, या बैठकीत विविध अधिकार मंडळावर अधिसभेतून सदस्यांची निवड होणार आहे.
या संदर्भात अधिसभा सदस्यांना विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने पत्र पाठवण्यात आले आहे. यानूसार मा.कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांच्या आदेशानूसार वकुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मान्यतेने अधिसभा बैठकीची तारीख आता १३ मार्च ऐवजी १२ मार्च करण्यात आली आहे. पुढच्या रविवारी (१२ मार्च) सकाळी ११ वाजता बैठक होईल. सर्व अधिसभा सदस्यांनी बैठकीस उपस्थित राहावे, असे कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी कळविले आहे.
विद्या परिषद, स्थायी समितीवर सदस्य निवडणार- दरम्यान, याच बैठकीत अधिसभेतून एक सदस्य संस्थामालकामधून तसेच प्राचार्य, प्राध्यापक व पदवीधर मधून एक सदस्य स्थायी समितीवर निवडूण जाणार आहे. मागास प्रवर्गातील एक अध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी असे दोन सदस्य तक्रार निवारण समितीवर निवडले जाणार आहेत, अशी माहितीही डॉ.भगवान साखळे यांनी दिली.
मोबाईलवर ताज्या बातम्या मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा👇
https://chat.whatsapp.com/BSbyNCHIS8N2dYDxjEaRne
सोमवार अर्ज मागे घेण्याचा दिवस – दरम्यान, अधिसभेतून ८ सदस्य व्यवस्थापन परिषदेवर निवडूण जाणार आहेत. यामध्ये प्राचार्य, प्राध्यापक, पदवीधर व संस्थाचालक गटातून प्रत्येकी दोन उमेदवार निवडूण येणार आहेत. यातील राखीव प्रवर्गातील चारही जागांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाला आहे. तर उर्वरित ४ चाजर जागांसाठी १४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. सोमवार दि.६ मार्च अर्ज मागे घेण्याचा आखेरचा दिवस आहे. यानंतर या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.